Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कुणाची यावर निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडली. शरद पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीत शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर (Ajit Pawar) मोठा आरोप करण्यात आला आहे. अजित पवार गटाने केवळ कार्यकर्तेच नाही तर पदाधिकाऱ्यांचे खोटे प्रतिज्ञापत्र तयार केला असल्याचा आरोप शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय. त्यामुळे अजित पवार गटावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शरद पवारांची वकिसांनी केली आहे.
Maratha Reservation : धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभांवर पोलिसांची कारवाई; नेमकं कारण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस कुवर प्रताप सिंग हे शरद पवार गटाबरोबर आहेत. तसे प्रतित्रापत्रही त्यांनी शरद पवार गटाला दिले आहे. त्यानंतरही अजित पवार गटाने त्यांचे खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून खोटी सहीही केली आहे. ते खोटे शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे. विशेष म्हणजे सुनावणी वेळी कुवर प्रतापसिंह हे शरद पवारांच्या बाजूला बसलेले होते.
…तर राज्याच्या अस्मितेचा जुगार झाला; बावनकुळेंच्या व्हायरल फोटोवर रोहित पवारांचा हल्लाबोल
अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. शरद पवार गटाकडून आयोगासमोर सातत्याने खोटी माहिती दिली जात आहे. तेच-तेच मुद्दे मांडले जात आहे. त्यामुळे ही केस निकाली काढावी, अशी मागणी रोहतगी यांनी केली आहे. आता दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता पुढील सुनावणी 24 नोव्हेंबरला होणार आहे.
मागील वेळीही असाच युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला होता. याचिकाकर्त्यांनी आयोगासमोर दाखल केलेल्या सुमारे 20 हजार प्रतिज्ञापत्रांची आम्ही तपासणी केली. 8900 प्रतिज्ञापत्रे बनावट असल्याचे आम्ही सांगितले. मृत व्यक्तीचे प्रतिज्ञापत्रही याचिकाकर्त्यांनी दाखले केले होते. काही अल्पवयीन लोकांचे प्रतिज्ञापत्र दिले आहेत, असा युक्तिवाद ज्येष्ठ विधिज्ज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी केला होता. आता त्याच पद्धतीचा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे.