Download App

महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही, प्रायश्चित अटळ; शरद पवार गटाचा पंतप्रधानांवर निशाणा

भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो.

  • Written By: Last Updated:

Ncp state president Jayant Patil On PM Modi apology: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (chhatrapati shivaji maharaj statue) पुतळ्या कोसळल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. या प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर राज्य सरकारकडून चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या दुर्देवी घटनेनंतर जनतेची माफी मागितली आहे. पालघर येथे वाढवण बंधराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी याप्रकरणी माफी मागितली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.

विधानसभेपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, आमदार जितेश अंतापूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे, असे जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हरियाणात भाजपला धक्का, मोदी मॅजिक ठरणार फेल? जाणून घ्या नवीन ओपिनियन पोल

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील कामातील भ्रष्टाचारामुळे राज्याची मान शरमेने खाली गेलीय. त्यानंतरही या सरकारला लाज कशी वाटली नाही. हा पुतळा कोसळलेला नाही तर राज्याचा स्वाभिमान धुळीस मिळालाय. जनतेच्या भावना लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितलीय. याचाच अर्थ त्यांनी चूक मान्य केलीय. पण राज्यातील शिवप्रेमी जनता या सरकारला माफ करणार नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे.

शिवरायांची माफी मागत पंतप्रधानांनी राहुल गांधींना घेरले

आमच्यासाठी शिवाजी महाराज फक्त महाराज नाही, राजपुरुष नाही, आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज डोकं शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, आमचे संस्कार वेगळे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काही लोक आज वीर सावरकरांना शिव्या देतात. त्यांना अपमानित करतात मात्र असे लोक आम्ही नाही. सावरकरांचा अपमान करून देखील माफी मागत नाही, न्यायालयात जातात पण माफी मागत नाही अशी टीका देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

follow us