विधानसभेपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, आमदार जितेश अंतापूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश
Jitesh Antapurkar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात काँग्रेसला (Congress) मोठा फटका बसला आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीमध्ये देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. आमदार जितेश अंतापूरकर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहे.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थितीमध्ये जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. आज भाजप प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
🕗 7.48pm | 30-8-2024📍Mumbai.
LIVE from BJP Maharashtra HQ, Mumbai#Maharashtra #Mumbai #BJP https://t.co/pLlEtqU60d
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 30, 2024
तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काॅंग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
कोरोना काळात आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचे निधन झाले होते त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांनी जितेश अंतापूरकर निवडून आणले होते. आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँगेस देगलूर विधानसभा मतदारसंघात कोणाला संधी देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
मोठी बातमी! महाठग सुकेश चंद्रशेखरला मोठा दिलासा, दिल्ली कोर्टाकडून जामीन मंजूर
काही दिवसापूर्वी आमदार जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असं आमदार जितेश अंतापूरकर म्हणाले होते.