लोकसभेनंतर सांगलीत विधानसभेतही रस्साखेच; जयंत पाटील विश्वजीत कदम पुन्हा आमने-सामने

लोकसभेनंतर सांगलीत विधानसभेतही रस्साखेच; जयंत पाटील विश्वजीत कदम पुन्हा आमने-सामने

Clashes in Jayant Patil and Vishwjeet Kadam Sangli : लोकसभा निवडणुकीत यंदा सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha Election) मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली होती. उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली असतानाही विशाल पाटील यांनी (Vishal Patil) बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. नंतर निवडणुकीत ते विजयी झाले. यानंतर आता विधानसभेच्या जागेवरून देखील सांगलीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. जयंत पाटील यांनी सांगली विधानसभेत तीन ते चार जागा जिंकण्याची दावा केला. तर तिकडे काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी पाच ते सहा जागा लढवणार असल्याचे म्हटलं आहे.

Ahmednagar : हृदयद्रावक… शेततळ्यात बुडून 3 मुलींचा मृत्यू, गावावर पसरली शोककळा

जाहीर सभेमध्ये बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सांगली विधानसभेत शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तीन ते चार जागा जिंकेल तसेच आणखी एखादी जागा आपल्याला मिळू शकते. तर विश्वजीत कदम म्हणाले की, कोणी काहीही बोललं तरी कॉंग्रेस पक्ष सांगली विधानसभेत 4 ते 5 जागा लढवणार आहे. असं म्हणत कदम यांनी जयंत पाटलांना टोला देखील लगावला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास झाला. मात्र त्याचं लवकरच चूक उत्तर देणार असल्याचा इशारा देखील यावेळी विश्वजीत कदम यांनी दिला.

इंडिया आणि कॅनडा लढत पावसात वाहून गेली, इंडिया टॉपवरच; सुपर आठचे सामने कसे होणार ?

लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चेचा मुद्दा राहिला तो सांगली लोकसभेचा. येथे उमेदवारीवरून जे काही रणकंदन सुरू होत ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. त्यानंतर आता येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 4 ते 5 जागांवर काँग्रेस पक्ष लढणार आणि जिंकणार असा विश्वासही कदम यांनी बोलून दाखवला. जिल्ह्याचे नेतृत्व जर आज सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी दिलंय तर माझं वचन आहे की, ज्यांनी ज्यांनी काँग्रेसद्वारे काम केलं त्याना चांगला न्याय देऊ. आता एक माणूस विशाल पाटील यांच्या रूपात लोकसभेत पाठवलाय, उद्या सांगली शहरातून दोन आमदार देखील विधानसभेत पाठवू, असा विश्वास कदम यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज