इंडिया आणि कॅनडा लढत पावसात वाहून गेली, इंडिया टॉपवरच; सुपर आठचे सामने कसे होणार ?

  • Written By: Published:
इंडिया आणि कॅनडा लढत पावसात वाहून गेली, इंडिया टॉपवरच; सुपर आठचे सामने कसे होणार ?

IND vs CANADA, Called Off Due to Rain Wet Out Field: पहिल्यांदाच अमेरिकेत होत असलेल्या टी-20 वर्ल्डकपचे (T 20 World cup) अनेक सामने हे पावसामुळे धुवून गेले आहेत. अनेक सामने रद्द झाल्याने वर्ल्डकपचे सुपर आठचे गणितच बिघडले आहे. तर भारत (INDIA) आणि कॅनडा ( CANADA) यांच्यातील आजचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने तीन विजय मिळविले आहेत. तर एका सामना रद्द झाला आहे. त्यामुळे सात पाँइटसह इंडिया आता ग्रुपमध्ये अव्वलस्थानी आहे. टीम इंडिया सुपर आठमध्ये दाखल झाला आहे.

महिनाभर का गप्प बसलात? तुमचं तोंड शिवलं…; प्रणिती शिंदेंच्या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर

तर चार सामन्यांत केवळ एक लढत कॅनडा संघ जिंकू शकला आहे. दोन लढतीत पराभव झाला असून, एक लढत रद्द झाली आहे. त्यामुळे कॅनडा स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तर भारत आणि अमेरिकेने सुपर आठमध्ये प्रवेश मिळविला आहे.

भारताच्या लढती कुणाबरोबर?

ग्रुप स्टेजमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या टीम इंडियाने सुपर आठमध्ये धमाकेदार पद्धतीने एंट्री केलेली आहे. सुपर आठमध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना 20 जूनला बारबाडोसच्या मैदानावर होणार आहे. दुसरा सामना बांगलादेश किंवा नेदरलँडविरुद्ध 22 जूनला होणार आहे. हा सामना एंटिगाच्या मैदानावर होईल. तर सुपर आठमधील अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

सहा संघ सुपर आठमध्ये

भारत, यूएसए, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे सहा संघ सुपर आठमध्ये दाखल झाले आहे. आणखी दोन संघ सुपर आठमध्ये जातील. त्यासाठी इंग्लंड, स्कॉटलंड, बांगलादेश, नेदरलँड्स संघाचा समावेश आहे. त्यात नेदरलँड्स संघाला संधी कमी आहे. सुपर आठमध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. त्यात प्रत्येक संघ तीन-तीन सामने खेळणार आहे. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. सुपर आठमध्ये ग्रुपमध्ये टॉपला राहणारे दोन संघ सेमीफायनलमध्ये दाखल होतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज