T20 World Cup 2026 कधी होणार? नवी माहिती मिळाली; भारतासाठी मात्र धोक्याची घंटा

टी20 वर्ल्डकप फेब्रुवारी 2026 ते मार्चपर्यंत सुरू राहील. याबाबत आधीच निश्चित करण्यात आले आहे.

Icc T20 World Cup

ICC T20 World Cup 2026 : पुढील वर्षात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील वेळेप्रमाणे या वर्ल्डकपमध्ये सुद्धा 20 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची तयारी आयसीसीने सुरू केली आहे. टी20 वर्ल्डकप फेब्रुवारी 2026 ते मार्चपर्यंत सुरू राहील. याबाबत आधीच निश्चित करण्यात आले आहे. आता या स्पर्धेतील संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. तरीही फायनल सामन्याबाबत सस्पेन्स कायम आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार 2026 टी 20 वर्ल्डकप 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान (ICC T20 World Cup) होणार आहे. या दरम्यान भारतात किमान पाच आणि श्रीलंकेत दोन ठिकाणी सामने होणार आहेत. परंतु कोणता सामना कुठे होणार याबाबत निश्चित नाही. आयसीसीकडून यावर काम सुरू आहे अजून अंतिम निर्णय झालेला नाही. तरीही त्यांच्याकडून वेळमर्यादा निश्चित करण्यात आली आहे आणि याची माहिती स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना देण्यात आली आहे.

T20 वर्ल्डकपमध्ये नव्या टीमची एन्ट्री; स्कॉटलंडला मागे टाकत इटलीचं तिकीट पक्कं 

टी 20 वर्ल्डकप फायनल कधी होणार याबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. रिपोर्ट्सनुसार फायनल अहमदाबाद किंवा कोलंबो यांपैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान जर फायनलमध्ये असेल तर हा सामना भारताबाहेर (Team India) होईल एवढे मात्र नक्की आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सध्या तणावाचे आहेत. भारताचा संघ पाकिस्तानात जात नाही त्याचपद्धतीने आता पाकिस्ताननेही टी 20 वर्ल्डकपसाठी भारतात येण्याचे नाकारले आहे.

आतापर्यंत 15 टीम पात्र

टी 20 वर्ल्डकपसाठी आतापर्यंत 15 क्रिकेट संघांनी क्वालिफाय केले आहे. यात भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्टइंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, नेदरलँड्स आणि इटली या संघानी आपली जागा पक्की केली आहे. दुसरीकडे उर्वरित पाच संघापैकी दोन आफ्रिका क्वालिफायमधून आणि तीन आशिया, पूर्व आशिया प्रशांत क्वालिफायरमधून येतील. ही स्पर्धा 2024 मधील फॉरमॅटप्रमाणेच होणार आहे.

ऑस्ट्रेलियाला धक्का! धडाकेबाज गोलंदाज मिचेल स्टार्कची टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती

follow us
  • fb
  • instagram
  • youtube