Download App

तर…निवडणुका स्वबळावर, शिवसेनेचा भगवा फडकवणारच! नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य

Neelam Gorhe On Upcoming Municipal Elections In Ahilyanagar : लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर (Municipal Elections) आता राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहेत. या निवडणुका महायुती म्हणून लढणार का? याबाबत अंतिम निर्णय हा देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेच घेणार असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी (Neelam Gorhe) सांगितलं आहे. युती झाली तर आनंदच आहे. मात्र, काही कारणास्तव युती नाही झाली तर स्वबळावर लढण्याची तयारी हा प्रत्येक पक्ष करतच असतो, असं सूचक विधान यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलंय.

नात्यांच्या गाठी, भावना आणि आठवणींचा हळुवार स्पर्श! ‘अमायरा’ चा ट्रेलर प्रदर्शित

अहिल्यानगर येथे दौऱ्यावर आलेल्या असताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अनेक विषयांवर भाष्य केलंय. यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती कशाप्रकारे लढणार, काय रणनीती असणार? या वरती गोऱ्हे यांना विचारण्यात आले. यावर बोलताना गोरे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीत यश मिळाले आहे. त्यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढणार, याबाबतचा सर्वस्वी निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे एकत्रित घेतील.

तसेच काही कारणास्तव युती होऊ शकली नाही, तर प्रत्येक पक्ष हा स्वबळावरती लढण्याच्या तयारीत असतोच. तरीही याबाबतचा अंतिम निर्णय हे शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हेच घेतील असेही, यावेळी गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

China Earthquake : चीन पुन्हा हादरला! भूकंपाचे जोरदार धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

अहिल्यानगरच्या मनपावरती शिवसेनेचा भगवा फडकवणारच

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणाऱ्या काळात होणार आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आता कार्यकर्ते यांच्यासह पक्ष देखील तयारीला लागले आहे. यातच अहिल्यानगर मनपावरती शिवसेनेचाच भगवा फडकवला जाईल, असं यावेळी गोऱ्हे म्हणाल्या. यापूर्वीचा इतिहास पाहिला तर संभाजीनगर आणि नगरवरती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकला आहे.

तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील चांगले यश मिळणार आहे. कारण नगर विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीतील काहींची मुस्कटदाबी झाली, त्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ आहे. त्यामुळे हे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहेत. यामुळे नगर जिल्ह्यावर पुन्हा एकदा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकवणार, असंही गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

 

follow us