अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पुणे शहराध्यक्ष कोण पठ्ठ्या होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत…

अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पुणे शहराध्यक्ष कोण पठ्ठ्या होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत…

विष्णू सानप

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवा (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रे पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला (NCP) महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर शहराध्यक्ष शोधण्याची वेळ आली आहे. या संदर्भात काल (बुधवार ता.14 मे) मुंबईत वरिष्ठांची बैठक पार पडली असून यामध्ये काही नावांची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

विजय शाह अजून मंत्रिमंडळात कसा? त्याची हकालपट्टी करा…; राऊत आक्रमक 

दीपक मानकर यांच्यावर पोलिसात बनावट कागदपत्र सादर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी शंतनू काकडे याला परदेशी महिलेने दिलेल्या बलात्काराच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये त्याचे मानकरांसोबत काही कोटींचे व्यवहार आढळून आल्यानंतर पोलिसांनी मानकर यांची देखील चौकशी केली होती. त्यानंतर मानकर यांनी या व्यवहाराबद्दल काही कागदपत्र पोलिसांना दिली होती, मात्र ते बनावट असल्याचं तपासात आढळून आल्यानंतर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मानकर यांनी आपला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

मोदींसाठी खास व्हिडिओ, भारत अन् बलुचिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना; कुणी घेतला पुढाकार? 

दरम्यान, मानकरांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष शोधण्याची वेळ आली आहे. या संदर्भात काल मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पुण्यातील हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह काही महिला पदाधिकारी व अन्य नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत काही नावांची चर्चा झाल्याचे समजते.

महापालिका निवडणुकीसाठी पुणे शहराला सक्षम आणि दांडगा जनसंपर्क असलेला शिवाय संघटन कौशल्य असणारा शहराध्यक्ष निवडीवर भर देण्यात आला. यामध्ये आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप तसेच सध्या कार्याध्यक्ष म्हणून काम पाहणारे ऍक्टिव्ह कार्यकर्ते प्रदीप देशमुख यांच्याही नावाची चर्चा करण्यात आली.

दरम्यान, अजितदादांच्या स्वतःच्या जिल्ह्यातील शहराध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादीकडून पूर्ण काळजी घेतली जात असून स्वतः अजित पवार यामध्ये लक्ष घालणार आहेत. यामुळे पुणे राष्ट्रवादीचा आणि अजित पवारांचा पुण्यातील कोण पठ्ठ्या असणार? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube