Neelam Gorhe यांना काळे फासणार; ठाकरे गटाची महिला आघाडी आक्रमक
Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गोऱ्हे यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटातील काही नेत्यांवर टीका केली. यानंतर आता ठाकरे गटाचे स्थानिक कर्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामध्ये अहमदनगरमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर यांनी नीलम गोऱ्हे यांना दिला काळे फासण्याचा इशारा दिला आहे. ( Shivsena UBT women’s Aggressive on Neelam Gorhe enter in Shinde Shivena )
शिवसेनेच्या ठाकरे गटातून आमदार नीलम गोऱ्हे या शिंदे गटात गेल्या आहेत. त्यामुळे गोऱ्हेंना अहमदनगरमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा स्मिता अष्टेकर यांनी दिला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.
बाळासाहेबांची शेवटची इच्छा कोणती? गडकरी म्हणाले, राज-उद्धव यांनी…
स्मिता अष्टेकर म्हणाल्या, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नीलम गोऱ्हेंना पुत्रवत प्रेम दिले. विधान परिषदेवर आमदार केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचे सभापती केले. त्यांच्याशी नीलम गोऱ्हेंनी गद्दारी केली आहे.
नीलम गोऱ्हेंच्या एका शब्दाखातर आम्ही महिला, कुटुंब सोडून त्यांच्या मागे फिरलो, मात्र आता त्यांना अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आल्यावर त्यांना फिरू देणार नाही. त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा स्मिता अष्टेकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.