Manoj Muntashir On Adipurush सिनेमातील डायलॉग्सबद्दल लेखकाने हात जोडून मागितली माफी; म्हणाला, ‘मी चुकलो..’

Manoj Muntashir On Adipurush सिनेमातील डायलॉग्सबद्दल लेखकाने हात जोडून मागितली माफी; म्हणाला, ‘मी चुकलो..’

Manoj Muntashir Shukla On Adipurush: ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुनताशीर शुक्ला (Manoj Muntashir Shukla ) यांनी लोकांची माफी मागितली आहे. मनोज मुंतशीर यांनी लिहिलेल्या आदिपुरुषाच्या संवादांवरून बराच वाद झाला होता. (Manoj Muntashir On Adipurush ) यामुळे नंतर काही संवाद देखील बदलण्यात आले आहेत. परंतु तरीही हा सिनेमा बघणारे संतापले आहेत. मनोज मुंतशीर शुक्ला यांनी आता ट्विट करून सर्वांची माफी मागितली आहे. आपल्या ट्विटमध्ये मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहे की, आदिपुरुष सिनेमामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

तसेच त्यांनी लिहिले आहे की, मी सर्व बंधू-भगिनी, वडीलधारी मंडळी आणि श्रीरामाच्या भक्तांची हात जोडून माफी मागत आहे. बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आम्हाला एक आणि अखंड राहून आमच्या पवित्र शाश्वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य द्या. आदिपुरुषच्या डायलॉग्सवरून झालेल्या वादानंतरही मनोज मुंतशीर यांनी त्यांच्या बाजूने अनेक युक्तिवाद केले होते. रामायणाची कथा आपण लहानपणी आपल्या आजी आणि आजीकडून ऐकल्याचेही त्यांनी सांगितले होते.

परंतु वाद वाढल्यानंतर त्यांनी या सिनेमातील ५ डायलॉग बदलल्याची चर्चा आहे. त्यात बदल करून हा सिनेमा पुन्हा सिनेमागृहात लावण्यात आला आहे. तरी देखील हा सिनेमा फारकाळ टिकला नाही. पहिल्या दिवशी सिनेमा नकारात्मक रिव्ह्यू आणि वादग्रस्त संवादामुळे मोठ्या वादात अडकला होता. पहिल्याच दिवशी १४३ कोटींची जगभरात कमाई करणारा ‘आदिपुरुष’ आता ३०० कोटींचा आकडा देखील पार करू शकेल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

कथा महाराष्ट्राच्या राजकारणाची अन् षडयंत्र-कट-कारस्थानाची; शरद पवार येणार मोठ्या पडद्यावर

सिनेमात प्रभाससह क्रीती सनॉन, देवदत्त नागे, सैफ अली खान, सनी सिंग हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने (Om Raut) सांभाळली आहे. या सिनेमात प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेमध्ये आहे. सनी सिंह लक्ष्मणाच्या तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. सैफ अली खानने या सिनेमात रावणाची भूमिका साकारली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ सिनेमाचा जोरदार बोलबाला पाहायला मिळाला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube