Download App

Nitesh Rane : राहुल गांधींवर कसाबसारखा खटला चालवा; राणेंचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

भाजपचे नेते व आमदार नितेश राणे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांना ओबीसी समाजाच्या विषयी वक्तव्य करायला आम्ही सांगितलेले नाही. त्यांनी देशाविरधात वक्तव्ये केलेले असून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.

ओबीसी समाजाच्याविषयी वक्तव्य करायला आम्ही त्याला सांगितले नाही. मोदी सगळे चोर आहेत, असे वक्तव्य करायला आम्ही त्याला सांगितले नाही. राहुल गांधी हे अमेरिका, इंग्लंड, केंब्रिज याठिकाणी जाऊन भारताची बदनामी करतात. त्यांच्यावर कसाब सारखा देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा व जी कलमे कसाबवर लावण्याता आली होती ती सर्व राहुल गांधींवर लावावी, असे राणे म्हणाले आहेत. पाकिस्तानाच्या बेनझीर भुट्टोचा मुलगा जी भाषा बोलतो तीच भाषा राहुल गांधी बोलतो. त्यामुळे राहुल गांधीला देशाच्या बाहेर काढून द्या, असे राणे म्हणाले आहेत.

राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, आशिष देशमुखांचा घरचा आहेर

तसेच यावेळी त्यांनी लव्हजिहाद वर देखील भाष्य केले आहे. हिंदु समाज म्हणून लव्हजिहादचे गांभीर्य काय आहे हे कळण्याची गरज आहे. काही जण बोलतात की लव्हजिहाद होत नाही. त्याला उत्तर म्हणून याविषयीची माहिती दिली पाहिजे, असे राणे म्हणाले आहेत.

राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक; ‘डरो मत’ देशव्यापी आंदोलनाची घोषणा

दरम्यान, काल शुक्रवारी जारी केलेल्या लोकसभा सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार राहुल यांना सभागृहातून अपात्र ठरवण्यात आले आहे. 2019 च्या मानहानीच्या प्रकरणात गुजरात न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राहुल 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Tags

follow us