राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, आशिष देशमुखांचा घरचा आहेर

राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, आशिष देशमुखांचा घरचा आहेर

नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या राहुल गांधी यांच्यावरील कारवाईमुळे कॉंग्रेसही चांगलीच आक्रमक झाली आहे. मात्र, कॉंग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आपला सुर बदलला आहे. राहुल गांधींनी माफी मागावी, अन्यथा याचा मोठा फटका कॉंग्रेसला बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आशिष देशमुख म्हणाले की, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सर्व जातीधर्माच्या लोकांना जोडण्याचं काम राहुल गांधी यांनी केलं. कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंत भारत जोडो यात्रेदरदम्यान, ते साडेतीन हजार किलोमीटर चाालले. या यात्रेमुळे राहुल गांधी हे लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले आहेत. अशा वेळी 2019 मध्ये त्यांच्यातोंडून काही शब्द गेले असतील आणि त्यामुळं ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील ओबीसी समुदायाला वाईट वाटलं असेल तर त्यांनी मोठ्या मनाने ओबीसी समाजाची माफी मागावी. कारण, एखाद्या समाज घटकाला चोर म्हणणं हे योग्य नाही, असं देशमुख म्हणाले.

ते म्हणाले, राहुल गांधी यांनी अनेकदा माफी मागीतली. चौकीदार चोर है च्या संदर्भात त्यांनी कोर्टात मागितली. राफेलच्या संदर्भा केलेल्या वक्तव्यामुळे अनेकजण नाराज झाले होते. त्यावेळीही त्यांनी सुप्रीम कोर्टात माफी मागितली. खऱ्या अर्थाने राहुल गांधी हे चांगल्या नियतीचे नेते आहेत. त्यांनी यापूर्वी काही प्रकरणामध्ये माफी मागून सुसंस्कृत नेत्याची आपली प्रतिमा तयार केली. त्यांच्या वक्तव्याने जर ओबीसी समाज दुखावला असेल तर त्यांनी मोठ्या मनाने मागावी. त्यामुळे ओबीसी समाजाच्या मनातील त्यांची प्रतिमा आणखी उंचावेल, असंही देशमुख यांनी सांगितलं.

Tejashwi Yadav चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात; तेजस्वी यांना अटकेची भीती

देशमुख यांनी सांगितलं की, येणाऱ्या काळात कर्नाटक, राजस्थान या राज्यांच्या निवडणूका आहेत. पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका आहेत. राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही तर आगामी काळात ओबीसी समाज हा कॉंग्रेसकडे पाठ फिरवून भाजपकडे जाऊ शकतो. त्यामुळं OBC वोट बॅंक भाजपकडे जाण्यापासून रोखायची असेल तर राहुल गांधी यांनी माफी मागावी, आणि या मागणीत गैर असं काहीच नाही. त्यांनी जरी चुकून जरी म्हटलं असेल तरी शेवटी त्यांच्या वक्तव्याने एका मोठ्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube