Download App

अशोक चव्हाण यांचा फक्त ट्रेलर, तीन तासांचा पिक्चर बाकी; नितेश राणेंचा मोठा दावा

Nitesh Rane On Vijay Wadettiwar:विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation Bill)एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता मराठा समाजाला यानंतर प्रत्येक नोकरीमध्ये आरक्षण मिळणार असल्याचे भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी सांगितले आहे. त्याचवेळी मराठा आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून कसलाही विरोध करण्यात आला नाही. त्यावरुन, नितेश राणे यांनी वडेट्टीवारांबद्दल अजब दावा केला आहे.

विधेयक मंजूर होताच ठाकरेंच्या अभिनंदनावर CM शिंदेंकडून ‘धन्यवाद’

यापूर्वी येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमचा आणि माझा बॉस एक असेल असं ट्वीट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना उद्देशून केलं होतं. त्यावरुन पत्रकारांनी नितेश राणे यांना प्रश्न विचारला, त्यावर राणे म्हणाले की, आत्ता माझ्या ट्वीटला आणखी महत्व प्राप्त झालं आहे. आणि समझनेवालों को इशारा काफी होता है, असंही यावेळी नितेश राणे म्हणाले.

Ankita Lokhande च्या पांढऱ्या साडीतील निखळ सौंदर्यावरून नजरच हटत नाही; पाहा फोटो

आमच्या बॉसने काय सांगितलं होतं? आगे आगे देखो होता है क्या? तुम्ही फक्त अशोक चव्हाण यांच्या निमित्ताने ट्रेलर पाहिला आहे, अजून तीन तासांचा पिक्चर बाकी आहे, असं म्हणत थेट विरोधीपक्षाला इशारा दिला आहे. अर्थात यावेळी नितेश राणे यांनी थेट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेच आपल्यासोबत येणार असल्याचा दावा केला आहे.

अबू आझमींना फटकारलं
सपाचे आमदार अबू आझमी यांनी आरक्षणाचं विधेयक फाडलं आणि मुस्लिम समाजाला आरक्षणाची मागणी केली आहे. त्यावर नितेश राणे म्हणाले की, मुस्लिम समजाला धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही. हे लोक उगाच आरक्षणाच्या नावावर समाजाला टोप्या घालत आहेत. म्हणून मुस्लिम समाजाला फसवत आहेत. धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही हे त्यांना माहीत आहे .

आम्ही जसा मागसलेपणा शोधला तसं तुम्ही शोधा. जसं मुस्लिम समजात पसमंदा जात आहे, पसमिंदा जातीत जर गरिबी असेल, त्यांच्यात मागसलेले असतील तर त्यांना आरक्षण मागा, त्यांना आरक्षण मिळेल पण धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही असेही यावेळी आमदार राणे यांनी म्हटले आहे.

आरक्षणाचा ड्राफ्ट फाडण्यापेक्षा अबू आझमी (Abu Azmi)यांनी स्वतचा फोटो फाडला असता तर मुस्लिम समजाने फटाके वाजवले असते, अशीही टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली.

follow us

वेब स्टोरीज