विधेयक मंजूर होताच ठाकरेंच्या अभिनंदनावर CM शिंदेंकडून ‘धन्यवाद’

विधेयक मंजूर होताच ठाकरेंच्या अभिनंदनावर CM शिंदेंकडून ‘धन्यवाद’

Cm Eknath Shinde On Udhav Thackeray : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यासाठीचं विधेयक राज्य सरकारकडून एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. राज्य विधी मंडळाच्या विशेष अधिवेशनात आज मंत्रिमंडळाकडून या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. उद्धव ठाकरे यांनी उपरोधिकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केल्याचं दिसून आलं. ठाकरेंच्या या अभिनंदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही धन्यवाद म्हणल्याचं दिसून आले आहेत. विधेयक मंजुरीनंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

मराठा आरक्षणासाठी विशेष कायदा : भरती प्रक्रिया सुरु झालेल्या परिक्षांमध्ये लाभ मिळणार का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला आहे. जेव्हा मराठा समाजबांधवांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी आम्ही आरक्षण देणार असल्याचा शब्दच आंदोलकांना दिला होता. त्यानंतर आज अखेर आम्ही अधिवेशनात विधेयक मंजूर केलं असून इतर दुसऱ्या कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितलं आहे.

मनोज तिवारीची क्रिकेटमधून निवृत्ती, एका गोष्टीचं व्यक्त केलं दुःख

तसेच माध्यमांकडून एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. उद्धव ठाकरेंकडून तुमचं अभिनंदन केलं जात असल्याचं म्हणताच शिंदेंनी मान हलवत उद्धव ठाकरेंच्या अभिनंदनावर धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘वडिलांच्या रक्तातच काँग्रेस, मी आहे तिथंच’; अमित देशमुखांनी ठणकावूनच सांगितलं

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी सरकारला वेठीस धरलं होतं. जरांगेंनी जालन्यापासून थेट मुंबईपर्यंत पदयात्राच काढली होती.

ही पदयात्रा मुंबईत धडकताच राज्य सरकारकडून जरांगेंच्या मागण्यांचा थेट अध्यादेशच काढण्यात आला होता. यावेळी आम्ही विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना दिला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube