Download App

औरंगजेबाच्या कबरीचा करेक्ट कार्यक्रम होणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा

Nitesh Rane On Maharashtra Government May Demolished Aurangzeb Grave : राज्यात छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठं तणावाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या मुघल राजाचा अंत महाराष्ट्राच्या मातीत झालाय. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबादला औरंगजेबाची कबर (Aurangzeb Grave) आहे. आता हीच कबर उद्धस्त करण्याची मागणी काही नेतेमंडळी करत आहेत. यावर आता मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलंय.

छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असू नये, ही भूमिका भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांची आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत मोठं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी (Chhatrapati Sambhajinagar) केलंय. त्यामुळे आता खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवली जाणार, या चर्चांना मोठं उधाण आलंय.

लाडक्या बहिणींचा सरकारवर भार,आदिवासी अन् समाजकल्याणचे 7 हजार कोटी वळवले; मंत्री शिरसाट अजितदादांना जाब विचारणार

मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय की, औरंगजेबच्या कबरीसंदर्भात आमच्या सरकारच्या प्रमुखांची देखील हीच मानसिकता आहे. आम्ही तयारीत बसलोय. कबर हटवत असताना पत्रकारांना सांगणार नसल्याचं देखील राणे यांनी (Chhatrapati Sambhajinagar News) म्हटलंय. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावर झालेलं अतिक्रमण हटवल्यांनतर ब्रेकिंग न्यूज दिलीय, असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिलाय.

“जयंत पाटलांचे मन कशातच लागत नाही, त्यांनीच मला सांगितलं”, मुश्रीफांच्या दाव्याने खळबळ!

नितेश राणे यांनी हिंदू समाजाला विश्वास दिलाय की, औरंगजेबाच्या कबरीचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम जरूर होणार आहे. सरकारकडे पाच वर्ष असून आम्ही आता पिचवर आलोय. सेंच्युरी मारायची असल्याचं सूचक विधान देखील नितेश राणे यांनी केलंय. जितकी जास्त औरंगजेबच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आलीय, तितकं त्या कबरीचा कार्यक्रम करायला मजा येणार असल्याचं देखील नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय.

तर औरंगजेबाच्या कबरीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं तणावाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगजेबच्या कबरीची सुरक्षा देखील वाढविण्यात आलीय.

 

follow us