Download App

नितीन देशमुखांना पोलिसाला धक्काबुक्की प्रकरण भोवलं! नागपुरात गुन्हा दाखल

नागपूर : शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी भवनाबाहेर पोलिसांशी असभ्य वर्तन करुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?
आमदार नितीन देशमुख यांनी काल रवी भवनाच्या बाहेर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्कीसह त्यांनी पोलिसांशी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला.

देशमुख यांनी पोलिसांवर अर्वाच्च भाषेत वर्तन करुन रवी भवन परिसरांत प्रवेश मिळवला आहे. देशमुख यांच्या दादागिरीमुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या नागपूर शहरामध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन-2022 सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने कांबळे यांची रवि भवन मुख्य प्रवेशद्वार इथे ड्यूटी लागली होती.

सकाळी रवी भवन येथे येणाऱ्या वाहनांचे पासेस चेक करुन तसेच येणाऱ्या व्यक्तींचे तेथेच बाजूला लागलेल्या पेन्डॉलमध्ये पासेस तयार झाल्यानंतर ते पासेस चेक करुन त्या व्यक्तींना आत प्रवेश देत होते.

त्यावेळीच आमदार नितीन देशमुख यांनी पीएसआय सखाराम एकनाथ कांबळे यांच्याशी असभ्य वर्तन करत त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की दिलीय. त्यानंतर त्यांनी रवी भवानात प्रवेश मिळवला आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपुरात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. पीएसआय सखाराम एकनाथ कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 353, 186, 448, 294, 506, 34 या कलमानुसार नागपुरातील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Tags

follow us