Nitin Gadkari on Jayant Patil NCP and Bjp : सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये राजारामबापू इन्स्टिट्यूटमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृह आणि व्यायाम शाळा हॉलचं (International student hostel and gym hall at Rajarambapu Institute) उद्घाटनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं.
प्रत्येक राज्याच्या राजधानीत होणार बालाजी मंदिर; मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंची घोषणा
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, जयंतराव तुम्ही फार राजकारणाचा विचार करू नका. मी पत्रकारांचा कधीही विचार करत नाही. तसेच मी जनतेलाही सांगितला आहे की, प्रभू रामचंद्र, सांप्रदायिकता, जातीयवाद अशा लोकांनी माझ्याकडे यायचं नाही. जो करेगा जात की बात उनको मे मारुंगा लाथ. त्यामुळे कुणाच्याही तुमच्याबद्दल लिहिण्यातून संवेदनशील होण्याची गरज नाही. आपल्याला राजकारणाची व्याख्या पुन्हा बनवणे गरजेचे आहे.
पहिल्यांदा भेट अन् नंतर प्रेम, टोकियो ऑलिंपिक चॅम्पियन नीरज चोप्राने सांगितली त्याची लव्ह स्टोरी
माझा पक्ष आणि माझे विचार माझ्यासोबत आहेत. राजकारण म्हणजे केवळ पॉवर पॉलिटिक्स नाही. तसेच महाराष्ट्राची ही परंपरा आहे की, राजकारण केवळ निवडणुकांपुरतं मर्यादित असतं. केवळ पंधरा दिवस कष्ट घेतात जो जिंकेल तो सिकंदर. त्यामुळे आजच्या हा कार्यक्रम राजकारणाचा नाही. तर जयंत पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. म्हणून मी या कार्यक्रमाला आलो. असे स्पष्टीकरण देखील यावेळी गडकरी त्यांनी याच कार्यक्रमात दिलं.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, माझी पत्रकारांना विनंती आहे की, आता नितीन गडकरी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या चालवू नका. कारण गेल्या काही दिवसांपासून अशाच चर्चा सुरु आहे. त्यावर आता नामंकित पत्रकार देखील बोलू लागले आहे, याचं मला आश्वर्य वाटतं. दोन वेगवेळ्या पक्षातील लोक चांगल्या कामासाठी एकत्र येऊ शकत नाहीत, अशीच पत्रकारांची धोरण झालेली दिसत आहे, हे चित्र पाहून मनाला वेदना होतात, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.