Nitin Gadkari : भाजपनेते नितिन गडकरी (Nitin Gadkari ) यांच्यावर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्यामुळे एकीकडे भाजप आणि अजित पवार गटाला विरोध करणाऱ्या पाटील यांनी गडकरींची स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी भाजपवर टीका देखील केली आहे. पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
काय म्हणाले जयंत पाटील?
नितीन गडकरी साहेबांचं नाव नेहमी माहिती असतं. कारण त्यांचा सर्वत्र प्रभाव असतो. ते सगळीकडे फिरतात. तसेच ते खुलेपणाने लोकांना हवं ते बोलू शकणारे ते एकमेव नेते दिसतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडसं सुप्त आकर्षण आहे. मात्र इतर कुणाचेही अस्तित्व नाहीये. पूर्वीच्या मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग जरी पंतप्रधान असले. तरी इतर घटक पक्षांच्या भूमिकेला तेवढेच महत्त्व असायचे. मात्र आजच्या घडीला भाजप सरकारमध्ये तशा प्रकारचं वातावरण दिसत नाही. अशी टीका करत यावेळी जयंत पाटलांनी नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमन उधळले आहेत.
Munna Bhai 3: मुन्नाभाई 3 संदर्भात राजकुमारानी हिरानीनं दिली मोठी अपडेट, ती ऐकून चाहते झाले खुश!
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी देखील पाटील यांनी अशाच प्रकरे गडकरींची स्तुती केली होती. नितीन गडकरी यांच्या रस्त्यांच्या कामाबाबत अनेक नेत्यांकडून त्यांचं वारंवार कौतुक केलं जातं. त्यामध्येच जयंत पाटील यांनी देखील सांगलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांचा तोंड भरून कौतुक केलं होतं. ते म्हणाले होते. ‘सांगलीत रस्ते उत्तम प्रकारे केले आहेत. त्यामुळे आपण वेगळ्या देशात आलो आहोत असं वाटतंय. तसेच यावेळी त्यांनी चांगल्याला चांगलं म्हटलं नाही. तर प्रॉब्लेम तयार होतात.’ असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला देखील लागला होता.
Box office Collection : प्रभासच्या ‘सालार’ने रचला इतिहास! जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
मात्र दुसरीकडे सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामधून जयंत पाटील हे अजित पवार यांच्या गटामध्ये येतील. अशा चर्चांना उधाण आलं आहे. यामध्ये जयंत पाटीलच अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा मंत्री आत्राम यांनी केला आहे. आत्राम म्हणाले, शरद पवार गटाचे नेते जे दावा करत फिरत आहेत की आमच्या संपर्कात अजित पवार गटाचे 15 आमदार आहेत. मात्र दावा करणारे जयंत पाटील हेच आमच्या संपर्कात आहेत. जे बोलणारे आहेत ते देखील येतील अस आत्राम म्हणाले. त्यामुळे जयंत पाटलांनी अशा प्रकारे नितीन गडकरी यांची कौतुक करणे याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.