Munna Bhai 3: मुन्नाभाई 3 संदर्भात राजकुमारानी हिरानीनं दिली मोठी अपडेट, ती ऐकून चाहते झाले खुश!

Munna Bhai 3: मुन्नाभाई 3 संदर्भात राजकुमारानी हिरानीनं दिली मोठी अपडेट, ती ऐकून चाहते झाले खुश!

Munna Bhai 3: राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) सध्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहेत. या सिनेमाने सर्वांची मने जिंकत आहे. दरम्यान, हिराणी यांनी संजय दत्त (Sanjay Dutt) अभिनीत त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मुन्ना भाई’ (Munna Bhai ) फ्रेंचायझीच्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या भागाबद्दल एक मोठी अपडेट सांगितली आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत राजकुमारानी हिरानी यांनी ‘मुन्ना भाई एमबीबीएस’चा (Munna Bhai MBBS) तिसरा भागाबद्दल मोठी माहिती सांगितली होती.

राजकुमार हिराणी ‘मुन्ना भाई’ फ्रँचायझीचा तिसरा भाग कधी आणणार? एएनआयशी बोलताना राजकुमार हिरानी म्हणाले की, “मुन्ना भाईसोबत आमचा संघर्ष असा आहे की, शेवटचे दोन चित्रपट इतके चांगले बनले आहेत की माझ्याकडे अजूनही 5 अर्ध-लिखित स्क्रिप्ट पडून आहेत. मी अनेकदा संजू (संजय दत्त) शी बोलतो. तो म्हणतो एक बनवावे. किंग खानचा ‘डंकी’ आता संपला आहे, त्यामुळे आता मी जुन्या कथांचा डबा उघडणार आहे. मला अजून एक मुन्नाभाई बनवावासा वाटतो, पण कधी ते मला माहीत नाही.”

‘मुन्ना भाई’ फ्रँचायझीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम 2003 मध्ये राजकुमार हिरानी यांनी पहिल्यांदा मुन्ना भाई (संजय दत्त) आणि सर्किट (अर्शद वारसी) या कॉमेडी चित्रपट मुन्ना भाई एमबीबीएस द्वारे जगाला ओळख करून दिली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि सुपर-डुपर हिट ठरला. त्यानंतर 2006 मध्ये हिरानींनी ‘लगे रहो मुन्ना भाई’ या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज केला. या चित्रपटात पुन्हा एकदा संजय दत्त आणि अर्शद वारसारी यांनी गांधीगिरीच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. आणि तेव्हापासून चाहते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Box office Collection : प्रभासच्या ‘सालार’ने रचला इतिहास! जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

हिरानींच्या ‘डंकी’चेही तोंडभरून कौतुक हिरानीचा नुकताच प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा ‘डंकी’ या चित्रपटाचेही खूप कौतुक होत आहे. तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, अनिल ग्रोव्हर आणि विक्रम कोचर यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि 200 कोटींचा आकडा गाठण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube