Download App

महायुतीतच पळवापळवी! शिंदेंच्या खास शिलेदाराने हाती बांधलं राष्ट्रवादीचं घड्याळ

Nitin Patil : लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीकडे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ) लागले आहे.

  • Written By: Last Updated:

Nitin Patil : लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीकडे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ) लागले आहे. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आज राज्यात एक मोठी राजकीय घटना घडली आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मोठा धक्का बसला आहे.

आज कन्नडचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते नितीन पाटील (Nitin Patil) यांनी राष्ट्रवादी काँगेस( अजित पवार गटात) प्रवेश केला आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नडमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

नितीन पाटील यांच्या पक्षप्रवेशाची माहिती देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक्सवर लिहिले की, मुंबईतील माझे निवासस्थान देवगिरी येथे आज कन्नडचे माजी आमदार व कन्नड साखर कारखान्याचे माजी चेअरमन नितीन पाटील जी यांनी माझी भेट घेत पक्षप्रवेश केला. लोकशाहीवादी पक्षात त्यांचे मनापासून स्वागत केले. राष्ट्रवादी पक्षाच्या संकल्पनेतील महाराष्ट्र, ज्यामध्ये चिरंतन प्रगती आणि स्थैर्य आहे, अशा राष्ट्रवादी विचारांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे राष्ट्रवादीत स्वागत आहे. असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

तर दुसरीकडे नितीन पाटील यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्याने आता कन्नड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. चर्चेनुसार, या मतदारसंघात हर्षवर्धन जाधव, उदयसिंह राजपूर आणि नितिश पाटील यांच्यात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

Paris Olympics 2024 : अर्जेंटिनाला धक्का, हॉकीमध्ये भारताने पुन्हा केली कमाल, सामना अनिर्णित

2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात मनसेकडून हर्षवर्धन जाधव तर शिवसेनेकडून उदयसिंह राजपूत निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र यंदा या मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

मी त्याचा बाप आहे… मुलाच्या वेगळ्या हालचाली दिसताच झिरवळांनी ठणकावलं

follow us