तुम्हाला अपात्र का करू नये? आमदार अपात्रते प्रकरणी अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

तुम्हाला अपात्र का करू नये? आमदार अपात्रते प्रकरणी अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Supreme Court notice to Ajit pawar in NCP hearing : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. त्यानंतर आता आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court ) सुनावणी (NCP hearing) सुरू आहे. या प्रकरणी आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार (Ajit pawar) गटाला नोटीस बजावत अपात्र का करण्यात येऊ नये असा सवाल केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती, कोण करू शकतं अर्ज?

दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या आमदारा पात्रतेच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. याचवेळी न्यायालयाने सारखाच प्रकरण असलेल्या शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणावर देखील एकत्रित सुनावणी घेतली. तसेच यापुढे देखील ही सुनावणी एकत्रितच पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या सुनावणीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अभिषेक माणूस सिंघवी यांनी युक्तिवाद मांडला.

Government Schemes : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

तर फेब्रुवारीमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जुलै 2023 मध्ये फूट पडलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी शरद पवार गटांपैकी अजित पवार यांचाच गट खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला होता. तर त्या अगोदर त्यांनी शिवसेनेच्या प्रकरणात देखील शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेलाच खरी शिवसेना असल्याचे निर्णय दिला होता. मात्र या निर्णयांमध्ये दरम्यान त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे किंवा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार अपात्र न ठेवता चारही गटांच्या आमदारांचे आमदारकी कायम ठेवली होती. या प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Video: अर्थसंकल्पाचा हलवा पिछड्या वर्गाला पाहायलाही मिळाला नाही; लोकसभेत राहुल गांधींचा घणाघात

follow us
  • fb
  • instagram
  • youtube