‘मी त्याचा बाप आहे…’, मुलाच्या वेगळ्या हालचाली दिसताच झिरवळांनी ठणकावलं

‘मी त्याचा बाप आहे…’, मुलाच्या वेगळ्या हालचाली दिसताच झिरवळांनी ठणकावलं

Narhari Zirwal :  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) गेल्या काही दिवसांपासून राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. झिरवाळ लवकरच अजित पवार (Ajit Pawar) यांना राम राम ठोकून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मात्र आज नाशिकमध्ये (Nashik) पत्रकारांची बोलताना मी मी आजही उद्याही आणि शेवटपर्यंत अजित पवार यांच्या सोबतच राहणार असं त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ते शरद पवार यांच्या पक्षात जाणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

पत्रकारांशी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, मी आजही उद्याही आणि शेवटपर्यंत अजित पवार यांच्या सोबतच राहणार आहे. निवडणुकीत लढायच झालं तरी अजित पवारांसोबतच लढणार असं झिरवाळ म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष कमी पडलो अस वाटत नाही मात्र जर तुमच्यासाठी स्थानिक उमेदवार असला की सहानुभूती मिळते, त्याचा अनुभव मला पण आला आहे असं देखील यावेळी झिरवाळ म्हणाले.

तर काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal ) यांनी मी काहीही झालं तर शरद पवार यांच्या सोबत राहणार अशी प्रतिक्रिया दिली होती त्यावर देखील आज झिरवाळ यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की,  त्याची चिंता नका करू. ते माझं पोरगं आहे. मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही. असं झिरवाळ म्हणाले. तो सत्कार करून पुढे जाणार होता म्हणून मी त्याला जाब विचारलं. सांगायचं इकडे आणि जायचं तिकडे अशातले आम्ही नाही मात्र तो कुठेच वावगा बोलला नाही याचा मला अभिमान आहे असं देखील झिरवाळ म्हणाले.

मनू भाकर पुन्हा करणार ‘करिश्मा’, भारताला मिळणार आणखी एक पदक, जाणून घ्या कसं?

तसेच श्रीराम शेटे झाले राजकीय गुरु आहे आणि त्यांनी मला कधीच माझा फोटो लावू नका असं म्हटलं नाही. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube