नरहरी झिरवाळ महाविकास आघाडीत जाणार? व्हायरल फोटो मागचं सत्य काय?

नरहरी झिरवाळ महाविकास आघाडीत जाणार? व्हायरल फोटो मागचं सत्य काय?

Narhari Zirwal : नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेले आहेत. त्यांच्या हा फोट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तसंच, त्यांच्यासोबत शरदचंद्र पवार गटाचे नेते श्रीराम शेटे देखील उपस्थित आहेत. नरहरी झिरवाळ हे अजित पवार गटात असताना आज अचानक विरोधी उमेदवारासोबत व्यासपीठावर दिसल्याने ते महाविकास आघाडीसोबत जाणार अशी चर्चा आहे. मात्र, त्यामध्ये तथ्य नसून एका कार्यक्रमानिमीत्त हे नेते एकत्र आले होते अशी माहिती समोर आली आहे.

Disqualification MLA : अरं बाबा त्याचा माझा काय संबंध; नरहरी झिरवळांनी अंगच झटकलं

महाविकास आघाडीत प्रवेश केल्याची चर्चा

दिंडोरी तालुक्यातील तीसगाव येथे मारुती मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी हे सगळे नेते एकत्र आले होते. अक्षय तृतीया निमित्त तेथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे व अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ हेही सोबत असल्याने नरहरी झिरवाळांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्याची चर्चा झाली. मात्र, तसे काही नसून ते केवळ भूमीपूजन कार्यक्रमासाठीच एकत्र आले होते अशी माहिती समोर आली आहे.

 

नाशिक लोकसभा मतदारसंघ आमचाच  हेमंत गोडसेंनी ठणकावूनच सांगितलं

एका कार्यक्रमानिमीत्त एकत्र

दिंडोरीत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आणि महायुतीच्या भारती पवार या दोघांचाही प्रचार जोरात सुरु आहे. सध्याचे राजकारण पाहाता कोण कधी कुठल्या पक्षात जाईल सांगता येत नाही. त्यातच असा फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. परंतु, तसं काही नसून हे नेते एका कार्यक्रमानिमीत्त एकत्र आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube