“बालबुद्धीने बोलणाऱ्यांकडं काय लक्ष द्यायचं” काका शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला

“बालबुद्धीने बोलणाऱ्यांकडं काय लक्ष द्यायचं” काका शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला

Sharad Pawar replies Ajit Pawar : शरद पवार कधीकधी संभ्रम निर्माण करणारी वक्तव्यं करत असतात. अशी त्यांची कार्यपद्धती राहिली आहे असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. बालबुध्दीसारखी वैशिष्ठ असणारे अनेक जण राजकारणात असतात.ते बालबुद्धीने बोलत असतात. त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं आपण, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला.

शरद पवार पुढे म्हणाले, लोकांच्या मतदानाचा अधिकार जर सरकारचे प्रतिनिधी स्वतःकडे घेत असतील तर याला काय म्हणणार. मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीसाठी काही पथ्य पाळण्याची गरज असते मात्र त्यांची भाषा या चौकटीत बसणारी नाही. आता लोकांनीच काय तो निर्णय घ्यावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेते निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली सेना म्हणून हिणवत आहेत. यावर शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. एखादा पक्ष एका विचाराने लोकांमध्ये जाऊन त्यांची सुख दुःख विचारत असेल, मत मांडत असतील तर त्याला नकली किंवा असली म्हणण्याचा अधिकार यांना कुणी दिला? प्रधानमंत्री यांनी काही गोष्टीत तारतम्य बाळगलं पाहिजे. हे अयोग्य आहे. आमच्या बुद्धीला जे पटेल ज्या विचारधारेत आम्ही वाढलो. त्या विचारधारेच्या बाहेर आम्ही जाणार नाही अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन? ‘मी असं बोललोच नाही’ शरद पवारांचा घुमजाव..

दरम्यान, पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” अशी मोठी ऑफर मोदींनी पवारांना दिली होती. त्यावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली. जे देशाच्या हिताचं नाही त्यात माझं सहकार्य असणार नाही असे म्हणत मोदींनी दिलेल्या ऑफरवर पवारांनी पूर्णविराम दिला आहे. लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासोबत मी कधीच जाणार नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube