Download App

महायुतीत रस्सीखेच! संजय मंडलिक यांनीच उमदेवारी द्या, ‘या’ आमदाराने लिहिलं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

  • Written By: Last Updated:

Prakash Abitkar : राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची उमेदवारी महाविकास आघाडीने जवळपास निश्चित केली. त्यानंतर आता भाजपकडून भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नावाचा प्रस्ताव समोर आला आहे. घाडगे यांना उमेदवारीसाठी तयारी करण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळं शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. अशातच आता मंडलिक यांचे समर्थक आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी मंडलिक यांनाच उमदेवारी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं.

लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, मग मी…; पंकजा मुडेंनी दिले लोकसभा लढण्याचे संकेत 

महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महायुती कोल्हापूरच्या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. संजच मंडलिक यांना उमेदवारी डावलली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता आमदार प्रकाश आबिटकर यांनी एक प्रसिद्धी काढलं. संजय मंडलिक यांनी आपल्या खासदारकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले असून त्यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी आबिटकर यांनी केली.

Government Schemes : गांडूळ खत अनुदान योजनेचा फायदा कोणाला अन् कसा घेता येणार? 

निवेदनात म्हटले आहे की, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांचे कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय जीवनात मोठे योगदान आहे. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब त्यांनी खासदरकीच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेवून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास केला असून त्यांचेकडे सर्वसमावेशक नेवृत्व कोल्हापूर जिल्हा पाहत होता. आता त्यांच्या नंतर खासदार संजय मंडलिक यांचेकडे सुध्दा सर्वसमावेशक नेवृत्व म्हणून कोल्हापूर जिल्हा बघत असून त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेची उमेदवारी द्या अशी मागणी मंडलिक प्रेमी जनतेच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचा विकासाचा आलेख वेगाने वाढतो आहे.

Mahayuti मध्ये CM Eknath Shinde यांची कोंडी होण्यामागची कारणे | LetsUpp Marathi

स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खासदारकीच्या काळात सर्वांना सोबत घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचा विकास केला असून त्यांचेकडे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून कोल्हापूर जिल्हा पाहत होता. आता त्यांच्या नंतर खासदार संजय मंडलिक यांच्याकडेही सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून कोल्हापूर जिल्हा बघत असून त्यांना येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेची उमदेवारी द्या, अशी मागणी मंडलिक प्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

follow us