Government Schemes : गांडूळ खत अनुदान योजनेचा फायदा कोणाला अन् कसा घेता येणार?

Government Schemes : गांडूळ खत अनुदान योजनेचा फायदा कोणाला अन् कसा घेता येणार?

Government Schemes : पीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपिकता महत्वाची असते. जमिनीची सुपिकता (Soil fertility)वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून (State Govt)विविध योजना राबवल्या जातात. त्यातील एक योजना म्हणजे गांडूळ खत अनुदान योजना(Vermicompost Subsidy Scheme). या योजनेंतर्गत शेतकरी आपल्या जमिनीची सुपिकता वाढवू शकतो. त्याचप्रमाणे शेतकरी याची विक्री करुन त्यामधून चांगला आर्थिक फायदा देखील मिळवू शकतो. ही योजना नेमकी काय आहे? या योजनेचा कोणाला अन् कसा फायदा मिळू शकतो? जाणून घेऊया.

The Railway Man: ‘द रेल्वे मॅन’ने नेटफ्लिक्सवर रोवला यशाचा झेंडा, “आतापर्यंतचा बनला यशस्वी…”

योजना सुरु करण्याचा उद्देश काय?
– शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली.
-गांडूळ खत प्रकल्प योजनेंतर्गत मिळणारी सबसिडी किती?
– अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर दोन हेक्टर ते पाच हेक्टरपर्यंत जमिन असेल तर त्या लाभार्थी शेतकऱ्याला 65 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल. जे शेतकरी अत्यल्प किंवा अल्प भूधारक असतील त्यांना 75 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते.

राज ठाकरे म्हणजे मिमिक्री आर्टिस्ट, त्यांनी आपला पक्ष सांभाळावा; राज ठाकरेंच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर

गांडूळ खत योजनेसाठी आवश्यक पात्रता
– ग्राम कृषी संजीवनी समितीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना मान्यता मिळाली आहे ते या योजनेस पात्र असणार आहेत.
– ज्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी जमीन आहे, त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल.
– अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिला व दिव्यांग नागरिकांना प्राधान्य क्रमांकानुसार लाभ मिळवून दिला जाईल.
– ज्या शेतकऱ्यांकडं गांडूळ खत युनिट उभा करण्यासाठी जागा आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना काही गोष्टींची तपासणी करुन लाभ मिळवून दिला जातो.
– याआधी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याने या योजनेंतर्गत लाभ घेतलेला नसावा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
– आधार कार्ड
– बँक पासबुक झेरॉक्स
– 7/12 उतारा
– पासपोर्ट आकार चे फोटो
– 8- अ प्रमाणपत्र
– जातीचे प्रमाणपत्र

गांडूळ खत यूनिट अनुदान खर्चासाठी मापदंड
गांडूळ खत युनिट उभा करायचे असेल तर प्रत्येक बेडसाठी या योजनेंतर्गत दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

अर्ज कुठे करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज सादर करत असताना आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत. जी काही माहिती आपण अर्ज करत असताना भरणार आहोत ती न चुकता भरावी. पुढील दिलेल्या प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा.

संकेतस्थळ : https//dbt.mahapocra.gov.in

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube