…’त्या’ लोकांना सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आली, मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

…’त्या’ लोकांना सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आली, मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Eknath Shinde On Uddhav Thackeray : शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde group)दापोलीमध्ये (Dapoli)आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर घणाघाती टीका केली. सरकारचं काम पाहून काही लोकांना मिरच्या झोंबतात. आरोप करतात, प्रत्यारोप करतात. पण त्या लोकांना आपल्या सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आली आहे. काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

Sandip Satav : साडेतीन हजारांची कमाई ते दोन हजार कोटींची उलाढाल करणारा मराठमोळा पुणेकर

त्याचवेळी दुसरीकडे शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांचं तोंडभरुन कौतुक देखील केलं. एकनाथ शिंदे हा उंटावरुन शेळ्या हाकणारा नाही, लोकांच्या सुख दु:खामध्ये धावून जाणारा हा एकनाथ शिंदे आहे. जर उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य शिवसैनिक, आमदार, खासदार यांच्याशी संवाद ठेवला असता तर आता जनसंवाद यात्रा काढावी लागली नसती, असा टोला देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे मोदी-शाह जोडीला खत्रूड म्हणतात… पण त्यांनी तर जुन्या दोस्तांनाही जिंकलं आहे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्हाला हा निर्णय का घ्यावा लागला हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. शिवसेनेचं महाविकास आघाडीत खच्चिकरण होऊ लागलं,त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. गेल्या दीड वर्षात अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर पळाले असे अनेकजण बोंबा मारत होते. पण जेव्हा आम्ही दावोसमध्ये गेलो त्यावेळी पाच लाख कोटीचे करारनामे केले. लाखो लोकांना त्यामुळे रोजगार मिळणार आहे.

तुम्ही जर उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवायला लागलात तर उद्योगपती महाराष्ट्रात कसे राहतील असाही सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. उद्योगपतींना सुरक्षा हवी असते. त्यांना सोयी सुविधा हवी असते. आम्ही अनेक कंपन्यांचे भूमीपूजन केले.

त्याचवेळी आमदार योगेश कदम यांनी मंडणगड येथील एमआयडीसीची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याचवेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांना या एमआयडीसीचा निर्णय तात्काळ घ्या अशा सूचना केल्या. मंडणगड येथे एमआयडीसी झाली पाहिजे. मंडणगड तालुक्यामध्ये 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालय देखील मिळेल हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारचं काम पाहून काही लोकांना मिरच्या झोंबतात. आरोप करतात, प्रत्यारोप करतात. पण त्या लोकांना आपल्या सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज