Download App

उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करायचं…, ‘त्या’ वक्तव्यावरून ओबीसी नेते संतापले

Mangesh Sasane criticizes Udayanraje Bhosale : महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Phule) यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhosale) महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाच्या सर्वप्रथम पाऊल थोरले प्रतापसिंह महाराज यांनी उचललं होत. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरु केली होती, असं म्हटलं. यावर मात्र ओबीसी नेते हे भडकल्याचं दिसतंय. उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करायचं असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून (OBC leader Mangesh Sasane) केला जातोय.

मी उदयनराजेंचं वक्तव्य तीन ते चार वेळेस ऐकलं. मुळात उदयनराजेंना महात्मा फुले यांचं महत्व कळलं, त्यामुळे ते येथे वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं. परंतु आजच्या 11 एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी येथे येवून महात्मा फुले यांचं महत्त्व कमी करायचं. त्यांच्या पूर्वजांचं महत्त्व वाढवायचं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो. शिवाजी महाराजांचा प्रथम पोवाडा महात्मा फुलेंनीच लिहिला.

“भीक नाही हक्काचे पैसे मागतोय”, अजितदादांवर मंत्री सरनाईक नाराज; एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा वाद वाढला..

सध्या जे चाललंय, कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले नाराज आहेत. त्यांनी आता वाघ्या कुत्रा कसा आला? यावर हरकत घेतली आहे. औरंगजेब नको, वाघ्या कुत्रा नको. दुसरे जे सातारचे महाराज आहेत. त्यांचा महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 रोजी भिडे वाडेत त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली, यावर आक्षेप आहे. अशी ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी नाव न घेता उदयनराजेंवर टीका केली आहे. नवा शोध उदयनराजेंच्या माध्यमातून लागत असल्याचं ससाणे यांनी म्हटलंय.

प्रतापसिंह महाराजांनी जी मुलींची शाळा सुरू केली होती. त्या मुली कोणत्या होत्या? त्यानंतर त्या मुलींचं काय झालं? ती शाळा परत चालू का राहिली नाही? त्यांच्या पुढच्या वंशजांनी, तुम्ही सुद्धा त्यांचा शैक्षणिक वारसा का सुरू ठेवला नाही, असा सवाल मंगेश ससाणे यांनी उदयनराजेंना केलाय.

‘विरोध करू नका…फुले चित्रपट लवकर प्रदर्शित होऊ द्या’; छगन भुजबळांची हात जोडून विनंती

समग्र वाड्मय घेऊन जावं किंवा मी उदयनराजेंना पाठवतो. त्यात काही चुका असतील तर पत्रकार परिषद घेवून मांडावं, असं ससाणे यांनी म्हटलंय. आता नवीन इतिहास लिहिला जातोय. संभाजी महाराजांना औरंगजेब नकोय, दादाजी कोंडदेव नकोय, वाघ्या कुत्रा नकोय. तर उदयनराजेंना मुलींच्या पहिल्या शाळेचे प्रणेते महात्मा फुले नकोत. महाराष्ट्रात चाललंय काय, छत्रपतींच्या वंशजांचा हा प्रयत्न दुर्दैवी असल्याची टीका मंगेश ससाणे यांनी केलंय. उदयनराजेंनी जे वक्तव्य केलंय त्यासमोर आतापर्यंतचे संशोधक अन् इतिहासतज्ज्ञ फेल ठरलेत, असं देखील ससाणे यांनी म्हटलंय.

मला त्यांच्या हेतुबद्दलच शंका येतेय. आतापर्यंत उदयनराजे कधी येथे आलेले पाहिलेलं नाही. आम्ही फुले प्रेमींनी त्यांचं स्वागत केलं. महाराजांचे पूर्वज महात्मा फुलेंना नमन करायला आले, हे पाहून आनंद वाटला. पण त्यांनी लगेच दुसरं रूप दाखवलं. मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली नाही तर प्रतापसिंह यांनी सुरू केली असं म्हटलं. हे ऐकून धक्का बसला. उदयनराजेंनी इतिहासकारांच्या हाताला एक नवं काम दिलेलं आहे. इतिहास उजागर करावा, पुरावे असतील तर आणावे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असं ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी स्पष्ट केलं.

 

follow us