अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?; शिंदेंच्या विधानावर बोलताना दादांनी घेतलं फडणवीसांचं नाव

Ajit Pawar replies Eknath Shinde : महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. त्याचबरोबर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेत आहेत, ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात. देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते भाजपचा झेंडा रोवायचा आहे असं सांगणार. मी गेलो तर, राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे असं सांगिन” असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याबातबत विचारले त्यावर अजित पवार म्हणाले, खऱ्या बातम्या द्यायला सुरुवात करा. तुम्ही काही केलं तरी आम्ही एकत्र राहण्याचं ठरवलं आहे. उद्या मी कुठल्या जिल्ह्यात गेलो तरी हा राष्ट्रवादीचा जिल्हा करू असं म्हणेल. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत. पुणे जिल्हा भगवा करायचा आहे. ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात. देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात गेले तर ते सांगू शकतात मी गेलो तर मी सांगू शकतो. तुम्ही किती उलटसुलट प्रश्न विचारा आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.
वाळू माफियांचा आका मनोज जरांगे, त्याने करोडोंची वाळू चोरली; ओबीसी नेत्याचा मोठा आरोप
बालकांच्या आरोग्याची तपासणी करणार
राज्यातील बालकांचे आरोग्य तपासण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. बालकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत. पुढचे निर्णय घेणे सोपे जाईल असे अजित पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. तीन मार्च रोजी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. आम्ही अर्थसंकल्प सादर करणार आहोत. सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. तसाच निर्णय आम्ही घेऊ असे अजित पवार म्हणाले.
मालमत्तेचे नुकसान कराल तर कारवाई
पूर्ण तपास होऊन सत्यता पुढे येऊ द्या. एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करत असाल तर स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कोणी करत असेल तर तो पक्ष किंवा त्या कार्यकर्त्यांकडून वसूल केले पाहिजे, असं कोर्टाने सांगितले आहे. राग व्यक्त करण्याच्या काही गोष्टी असू शकतात. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. त्यांनाही कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवार यांनी दिला.
Swargate Rape : निवडणुकीतील उमेदवार ते अजितदादांच्या आमदारासोबत फोटो; गाडेची कुंडली कशी?