वाळू माफियांचा आका मनोज जरांगे, त्याने करोडोंची वाळू चोरली; ओबीसी नेत्याचा मोठा आरोप
पोलिसांनी जरांगेच्या मेहुण्यावर तडीपारची कारवाई केली. मात्र, या टोळीचा आका मनोज जरांगे मोकाटच आहे, त्याची बेड्या घालून धिंड काढा.

Mangesh Sasane : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवाली सराटी येथे 15 फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहे. अशातच जरांगेंचा मेहुणा विलास खेडकर (Vilas Khedkar) याला जालना जिल्हा प्रशासनाने तडीपार केलंय. यावर आता ओबीसी नेते मंगेश ससाणे (Mangesh Sasane) यांनी भाष्य केलं.
पोलिसांनी जरांगेच्या मेहुण्यावर तडीपारची कारवाई केली. मात्र, या टोळीचा आका मनोज जरांगे मोकाटच आहे, त्याची बेड्या घालून धिंड काढा, अशी टीका ससाणे यांनी केली.
ससाणे म्हणाले, राज्यात गेल्या एका वर्षापासून जातीयवादांचं विष पेरणाऱ्या जरांगेंचा अखेर खरा चेहरा समोर आला. महाराष्ट्र पोलिसांनी जरांगेच्या मेहुण्यावर तडीपारची कारवाई केली. मात्र, टोळाचा मुख्य सुत्रधार आणि आका असलेल्या मनोज जरांगेंना मोकाटच सोडलं. मराठ्यांसाठी लढणारा हा माणूस खरंच समाजाचा उद्धारक आहे का, की त्याच्या सावलीत माफियांना अभय मिळतंय?, असा सवाल ससाणे यांनी केला.
पुढं ते म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जरांगे, सुरेश धस, अंजली दमानिया यांनी गुन्हेगाराला जात नसते, असं सांगितलं. पण, आता जरांगेचा तिळपापड होतोय. कारण या टोळीचा म्होरक्या हा स्वत: जरांगे असून मेहुण्यानंतर आपला नंबर लागेल, अशी भीती त्याला आहे, असं ससाणे म्हणाले. तसेच सुरेध धस, अंजली दमानिया यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करावा आणि वाळू माफियांचा आका कोण? हे सभांतून सांगावं, असंही ते म्हणाले.
अंतरवलीतील हिंसाचाराचा सुत्रधारही जरांगेंच
अंतरवलीत झालेल्या दगडफेकीच्या चौकशीसंदर्भात एसआयटी नेमली. मात्र या हिंसाचाराच्या तपासाला गती का दिली जात नाही? या प्रकरणाचा SIT अहवाल कुठे गेला? असा सवाल करत या घटनेचा सुत्रधारही जरांगेच असणार. गृहमंत्र्यांना विनंती आहे, लवकरात लवकर या घटनेची चौकशी करावी. मेहुणा आणि इतर पिलावळींच्या माध्यमातून जरांगेने स्वत:ची कृत्रिम हवा करून वाळू माफिया तयार केले. जरांगेने हजारो-करोडो रुपयांचा महसूल आणि वाळू चोरली, असा आरोपही ससाणे यांनी केला.
आज जरांगे राज्य सरकारला आणि गृहमंत्र्याला ललकारतोय. जरांगेचा मुजोरीपणा सहन केला तर चुकीचा मॅसेज जाईल. जरांगेचा मोबाईल चेक केला तर तडीपार झालेले आरोपी आणि जरांगेचे लागेबांधे असल्याचं पुढं येईल. या टोळीचा म्होरक्या जरांगे असून त्याची हातात बेड्या घालून धिंड काढावी, असंही ससाणे म्हटलं.