‘दरवर्षी १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त फसवणूक…’; मस्कने घेतला यूएस गव्हर्नमेंट पेमेंट सिस्टम्सवर आक्षेप

  • Written By: Published:
‘दरवर्षी १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त फसवणूक…’; मस्कने घेतला यूएस गव्हर्नमेंट पेमेंट सिस्टम्सवर आक्षेप

Elon Musk on Us Govt Payment System : टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी रविवारी अमेरिकन सरकारच्या पेमेंट सिस्टमवर तीव्र आक्षेप घेतला. या पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून दरवर्षी १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची फसवणूक आणि अनियमितता होत असल्याचं ते म्हणाले.

मनोज जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई, काय आहे नेमकं प्रकरण? 

नुकतीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी DOGE (डिपार्टमेंट ऑफ गर्वनमेंट एफिसिएंसी) ची स्थापना केली आहे. या विभागाचे प्रमुख एलन मस्क आहेत. दरम्यान, आज मस्क यांनी अमेरिकन सरकारच्या पेमेंट सिस्टमवर आक्षेप घेतला आहे. मस्क यांनी यासंदर्भात एक्स अकाऊंटवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी दावा केलाय की, सरकारी पेमेंट सिस्टममध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून दरवर्षी १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त फसवणूक होत आहे. ही फसवणूक होऊ नये यासाठी वित्त विभाग आणि सरकारी दक्षता विभागाने एकत्रितपणे सरकारी देयकांवर देखरेख ठेवण्यासाठी नवीन नियम तयार केल्याचंही ते म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा का नाही, देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल का? अंजली दमानियांचा सवाल 

मस्क म्हणाले की, आतापासून सर्व सरकारी देयके नवीन नियमांनुसार केली जातील. सर्व सरकारी देयकांमध्ये ‘पेमेंट वर्गीकरण संहिता’ असेल, ज्यामुळे ऑडिट करणे सोपे होईल. मस्क यांनी असेही म्हटले आहे की आता पेमेंट करताना कारण द्यावे लागेल.

फसवणूक रोखण्यासाठी ‘डू-नॉट-पे’ सूची
मस्कने आणखी एक मोठी समस्या दाखवली. ते म्हणाले की, ‘डू-नॉट-पे’ यादी, ज्यामध्ये फसवणूक करणारे, मृत व्यक्ती, संशयास्पद संस्था किंवा चुकीचे पैसे मिळवणाऱ्यांचा समावेश आहे, ती वेळेवर अपडेट केली जात नाही. सध्या, एखाद्याचे नाव जोडण्यासाठी एक वर्ष लागू लागतो. परंतु ते दर आठवड्याला अपडेट केले पाहिजे.

दर आठवड्याला होतात घोटाळे
मस्क यांनी असा दावाही केलाय की, अमेरिकेत दरवर्षी सुमारे १०० अब्ज डॉलर्स अशा लोकांना दिले जात आहेत ज्यांच्याकडे सोशल सिक्युरिटी नंबर (SSN) नाही. आणि हे अत्यंत संशयास्पद आहे. त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले की, या रकमेपैकी किती रक्कम निश्चित फसवणूक असू शकते, तेव्हा त्यांना उत्तर मिळाले की सुमारे $५० अब्ज (दर आठवड्याला $१ अब्ज) इतके रुपयांचा हा घोटाळा असू शकतो. मस्क यांनी याला ‘वेडेपणा’ म्हटलं असून ही समस्या त्वरित सोडवली पाहिजे असे सांगितले.

मस्क यांचा इशारा संदेश
एक चार्ट शेअर करताना मस्क यांनी लिहिले की, ‘सरकारी देयकांमध्ये (जी तुमच्या करांमधून दिली जाते) फसवणुकीची रक्कम तुम्हाला वाटते त्यापेक्षा खूप मोठी आहे आणि ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. सरकारने लवकरात लवकर यावर कारवाई करावी, असंही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube