मनोज जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई, काय आहे नेमकं प्रकरण?

  • Written By: Published:
मनोज जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई, काय आहे नेमकं प्रकरण?

Manoj Jarange Patil Latest News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवाली सराटी येथे 15 फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहे. तसेच आपल्याला हलक्यात घेण्याची चूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करू नये, असा सज्जड दम त्यांनी भरलेला आहे. अशातच जरांगेंचा मेहुणा विलास खेडकर (Vilas Khedkar) याला जालना जिल्हा प्रशासनाने तडीपार केलंय. वाळू तस्करीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

दिल्लीत मुख्यमंत्री शपथविधी कधी होणार? भाजपाच्या नेत्यांचं खास प्लॅनिंग.. 

जालना, बीड या जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहात प्रशासन आता प्रशासन अॅक्शन मोडवर आले. जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी या परिसरातील वाळू माफिया आणि इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं. विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसूरराव तौर अशी पोलिसांनी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचे निधन, नेमकं काय घडलं? 

यातील विलास खेडकर हे जरांगे पाटील यांचे मेहुणे असून त्यांच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात जालन्यातील अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, अशी माहितीही समोर आली.

मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग
विषेश म्हणजे, तडीपार करण्यात आलेल्या 9 आरोपांपैकी 6 आरोपी हे मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये सक्रिय होते. या सहा आरोपींना परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमधून तडीपारीची कारवाई करण्यात आली. सदर आरोपींवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवली सराटीच्या आंदोलनाच केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणल्यासंबंधी जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहे.

जरांगे काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी तडीपार कारवाईवर भाष्य केलं. ते म्हणाले, माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या नातेवाईकांवर आणि कार्यकर्त्यांची नावे तडीपारीच्या यादीत घालण्यात येत आहे. हे १०० टक्के फडणवीसांचा षडयंत्र आहे, असं जरांगे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube