निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचे निधन, नेमकं काय घडलं?

  • Written By: Published:
निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचे निधन, नेमकं काय घडलं?

vikas walkar passed away : श्रद्धा वालकरचे (Shraddha Walker) वडील विकास वालकर (Vikas Walkar) यांचे निधन झाले. वसई परिसरातील त्यांच्या राहत्या घरी विकास वालकर यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जातंय. आज सकाळी ८ वाजता विकास वालकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अमित शाहंची बैठक, आतिशींचा राजीनामा…दिल्लीत सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग 

आज सकाळी ८ वाजता विकास वालकर यांची प्रकृती अचानक बिघडली होती.
त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने कार्डिनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विकास वालकर यांच्य जवळच्या नातेवाईकांना सांगितले की, मुलगी श्रद्धाच्या हत्येनंतर विकास वालकर निराश होते. मुलीला न्याय कधी मिळणार, याची ते प्रतिक्षा करत होते. शिवाय, श्रध्दाच्या अंत्य संस्कारांसाठी तिच्या मृतदेहाच्या उर्वरित भाग ताब्यात मिळावेत, यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र, श्रद्धाच्या मृतदेहांचे अवशेष पोलीस तपासातील पुरावा असल्यानं विकास वालकरांना ते देण्यात आले नाहीत. त्यामुळे श्रध्दाच्या मृतदेहाच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्याची त्यांची इच्छा अधुरीच राहिली.

जरांगेंकडून उपोषणाच्या नावाखाली समाजाला वेड्यात काढण्याचं काम सुरू; नवनाथ वाघमारेंची टीका 

२०२२ मध्ये दिल्लीत श्रद्धा वालकरची हत्या झाली होती. तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने तिची हत्या केली. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे सुमारे ३५ तुकडे करून मृतदेहाचे तुकटे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात फेकले होते. दिल्ली पोलिसांनी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी आफताबला अटक केली. तेव्हापासून तो दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे. या हत्येचा खटला न्यायालयात सुरू आहे. आपल्या मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून विकास वालकर न्यायालयीन खटला लढत होते.

दरम्यान, आज विकास वालकर यांचा अचानक मृत्यू झाल्यानं श्रध्दा वालकर यांचा अचानक मृत्यू झाल्याने श्रद्धाच्या आरोपीला फाशी कधी मिळणार, असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या