श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; श्रद्धाचा ‘तो’ व्हिडिओ पोलिसांच्या हाती

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; श्रद्धाचा ‘तो’ व्हिडिओ पोलिसांच्या हाती

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील (Shraddha Murder Case)आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala)याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबत दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टात (Delhi Saket Court)पोलिसांनी (Delhi Police)सांगितलं की, या प्रकरणातील घटनाक्रम पाहता आफताबच्या गुन्ह्याबद्दल असा निष्कर्ष निघतो की, आरोपीने विचार करून ही घटना घडवली आहे. पोलिसांनी सांगितलं की, परिस्थितीजन्य पुराव्यावरून असं दिसून येतंय की, श्रद्धा आणि आफताबचं लिव्ह इन रिलेशनशिप (Love in Relationship) हिंसक होतं.

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, तपासादरम्यान असं समोर आलंय की, आफताब तिला मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा, असा आरोप श्रद्धानं केला होता. आफताबनं तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि तिचे तुकडे करण्याची धमकीही दिली.

शुभमचे देशसेवेच्या स्वप्नासाठी फडणवीसांनी लावली यंत्रणा कामाला

दिल्ली पोलिसांच्या वकिलानं सांगितलं की, श्रद्धा वॉकर Feom Practo अॅपच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला घेत होती. कोर्टात श्रद्धाच्या समुपदेशनाचा एक व्हिडीओ प्ले झाला होता, त्यामध्ये श्रद्धा म्हणतेय की, आफताब तिला शोधून मारेल. दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, श्रद्धाच्या बँक खात्यातून 2 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचा पुरावा आहे, तिच्याकडे क्रेडिट कार्डही होते.

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, तपासादरम्यान पोलिसांना श्रद्धाची हाडं, जबडा आणि रक्ताच्या खुणा आढळल्या, रेफ्रिजरेटर आणि खोलीच्या कपाटात रक्त आढळलं. विविध ठिकाणी श्रद्धाचे अवयव सापडले आहेत. डीएनए अहवालात जप्त केलेल्या शरीराचे अवयव हे केवळ श्रद्धाच्या शरीराचे अवयव असल्याची पुष्टी झाली आहे.

आरोपी आफताबच्या फ्रीजमध्ये करवत, पाणी, क्लिनर आणि अगरबत्ती खरेदी केल्याचे पुरावे असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याचवेळी पूनावाला यांची भेट घेतलेले सरकारी वकील जावेद हुसैन यांनी दिल्ली पोलिसांच्या युक्तिवादांना उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 मार्च रोजी साकेत न्यायालयात होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube