शुभमच्या देशसेवेच्या स्वप्नासाठी फडणवीसांनी लावली यंत्रणा कामाला

शुभमच्या देशसेवेच्या स्वप्नासाठी फडणवीसांनी लावली यंत्रणा कामाला

पुणे : आर्मीमध्ये भरती व्हावे व देशसेवा करावी यासाठी अनेक तरुण जीवाचे रान करतात. यातच काही किरकोळ कारणास्तव अनेकांचे हे स्वप्न अधुरेच राहते. असेच काहीसे शुभमच्या बाबतीत देखील घडले. शुभमचे पोलीस व्हेरिफिकेशनसाठी काम अडले होते. यामुळे हातातोंडाशी आलेला त्याचा घास हिरावून जाईल अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली. हताश झालेल्या शुभमचे स्वप्न सत्यतेत उतरवण्यासाठी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिंगणात उतरले. फडणवीसांचा एक फोन आणि यंत्रणा कामाला लागली अन शुभमचे स्वप्न सत्यतेत उतरलं. माझ्यासाठी जणू तुम्ही खरोखरच देव आहात अशी भावनिक पोस्ट शुभमने केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेबाबत शुभम शिवाजी बोटे याने ट्विटरवरून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

काय आहेत शुभमची पोस्ट? पहा

साहेब तुमच्या नावातच देव आहे. तुम्ही खरोखर देव आहात असे शुभमने म्हंटले आहे. मित्रांनो मी नुकताच आर्मीत भरती झालो. परंतु पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये काही अडथळे आले ते सुटता सुटत नव्हते.

हातातोंडाशी आलेली नोकरी आणि गेली याच अपेक्षेने घरी बसलो. माझा जीव कासावीस झाला. आई – वडिलांच्या कुशीत डोके ठेऊन मोठमोठयाने रडत होतो. आर्मीमध्ये जाऊन देशसेवा करण्याच माझ स्वप्न भंगले गेले होते. डोळ्यापुढे संपुर्ण अंधार होता.

फेसबुक सोशल मीडिया स्क्रोल करत असताना देवेंद्रजी फडणवीस यांची फेसबुक अपडेट पुढे आली . माझ्यासोबत झालेला प्रकार देवेंद्र फडणवीसांना सांगुन काय होतय का याची चाचपणी सुरु केली. देवेंद्रजींच्या पोस्टवर रोज लाईक कमेंट करणाऱ्या २-३ कार्यकर्त्यांना फेसबुक मेसेज केले.

शुभम पुढे म्हणतो, गणेश कराड यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील स्विय सहाय्यक मनोज मुंडे यांचा पर्सनल नंबर शेअर केला. आजच २० मार्च दुपारी दोन वाजता कागदपत्रे जमा करण्याची शेवटची वेळ होती. सकाळी माझा फोन वाजला. समोरुन आवाज होता मी देवेंद्र फडणवीस बोलतोय.

हे एका चमत्काराच्या ही पलीकडे होतं. स्वतः साहेब बोलले. त्यांनी माझी अडचण ऐकून घेतली आणि सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या. पोलीस व्हेरिफिकेशनमधील सर्व अडचणी दूर झाल्या. माझ्या तोंडुन सुटलेला घास अलगद माझ्या मुखात घालण्याच काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. थँक्यू अन्नदाता असे म्हणत शुभमने देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाचे आभार मानले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube