धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा का नाही, देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल का? अंजली दमानियांचा सवाल

  • Written By: Published:
धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा का नाही, देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल का? अंजली दमानियांचा सवाल

Anjali Damania : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania)यांनी देखील या प्रकरणावरून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

तर आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत स्व. संतोष देशमुख यांचा तपास योग्य होणार का? सामान्य लोकांना (देशमुख कुटुंबाला) खरंच न्याय मिळेल का? असा प्रश्न त्यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत विचारला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, स्व. संतोष देशमुख यांचा तपास योग्य होणार का? खूप काही लपवलं जातय अस वाटतंय 9 तारखेला काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल मिळाले होते. त्यात एका बड्या नेत्याचा फ़ोन आला होता अशी बातमी माध्यमांनी दाखवली होती. तो मोबाईल डेटा रिट्रीव करण्यासाठी फॉरेंसिक मधे पाठवण्यात आला होता, आता 2 महिने झाले. कधी मिळणार तो डेटा ? कधी कळणार त्या नेत्यांचे नाव? आणि त्यांना वाचण्यासाठी कराड सुद्धा सुटणार अशी भीती वाटते.

दुसरं म्हणजे 19 जुन ला सातपुडा या शासकीय बंगल्यात आवदा कंपनी बरोबर 3 कोटीचा व्यवहार झाला असे धस म्हणाले होते, मग त्यात पुढे काय चौकशी झाली? काय स्टेटमेंट घेतली? अवादा च्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट घेतली का? मग धनंजय मुंडे यांच्यावर का गुन्हा झाला नाही? सामान्य लोकांना (देशमुख कुटुंबाला) खरंच न्याय मिळेल का? असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मारुतीची 8 सीटर कार, भन्नाट फिचर्स, दमदार इंजिन अन् डिस्काउंट तब्बल 3.15 लाखांचा

तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील अनेक धक्कादायक खुलासे केल्याने फरार आरोपीला कधी अटक होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube