Download App

दानवे-लाड यांच्यात तू तू में-में! मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद, दानवेंनी धमकावलं…

मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद आहे, या शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकावलं आहे. दरम्यान, विधिमंडळात आज दानवे आणि लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झालीयं.

Image Credit: Letsupp

Ambadas Danve On Prasad Lad : विधिमंडळाच्या सभागृहात आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात तू-तू में में झाल्याचं दिसून आलं. लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदु समाजाबद्दल अवमानजनक भाष्य केल्याने भाजपच्या आमदारांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही आक्रमक पवित्रा घेण्यात आला. यामध्ये अंबादास दानवे यांनी भर सभागृहात शिवीगाळ केली असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलायं. या वादामुळे गोंधळ झाल्याने सभा तहकूब करण्यात आलीयं. एकूणच या वादानंतर अंबादान दानवे यांनी मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद असल्याचं म्हणत प्रसाद लाड यांना माध्यमांशी बोलताना धमकावलं आहे.

Sharad Pawar यांच्या सात शिलेदारांची आमदारकी निश्चित; जाणून घ्या कारणं…

अंबादास दानवे म्हणाले, सभागृहात माझा तोल गेलेला नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा असून माझ्यावर कुणी बोट केलं तर बोट तोडण्याची ताकद आहे. राहुल गांधी यांचा हा विषय सभापतीला बोला, माझ्याकडे बोट करण्याचं काही काम नाही. भाजपचा जुम्मा-जुम्मा आलेला माणूस मला हिंदुत्व शिकवतोयं का? माझ्यावर अनेक केसेस आहेत, प्रसाद लाडसारखा धंदा करणारा मला हिंदुत्व शिकवणार का?
गांधी यांचा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का? असा सवाल मी सभापतींना केला होता, त्यावेळी विरोधकांचा मला बोलायचं काही कारण नव्हतं त्यानंतर माझ्यातला शिवसैनिका जागा झाला असल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केलंय.

Barzakh Trailer: भूत, प्रेम आणि सस्पेन्स! फवाद खान-सनम सईदच्या ‘बरजाख’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

आमदार प्रसाद लाड यांनी काय आरोप केले?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भर सभागृहात हातात माईक घेत आमच्या आई-बहीणीवर शिवीगाळ केलीयं. त्यामुळे शिव्या देणाऱ्या दानवेंवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना निलंबित करुन राजीनामा घ्यावा. लोकसभेत आज राहुल गांधींनी भगवान शिवशंकरांचं नाव घेत हिंदु समाज हिंसक असल्याची अभद्र भाषा केली त्याचा मोदींनी निषेध केलायं . ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर आम्ही हा विषय सभागृहात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर सभा सुरु झाल्यानंतर आम्ही राहुल गांधींच्या विधानाच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. तेव्हा अंबादास दानवे उत्तर देण्यास उभे राहिले त्यावेळी माझं भाषण सुरुच होते त्यावेळी त्यांनी आमच्यावर आई आणि बहीणीवर शिवीगाळ केली. हिंदुंचा अपमान दानवेंनी केलायं, त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही लाड यांनी दिलंय.

follow us

वेब स्टोरीज