Download App

एका व्यासपीठावर येताच जरांगेंकडून पंकजांना खुर्ची, पंकजांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस

Pankja Munde आणि मनोज जरांगे यांनी मराठा आणि ओबीसी या वादा दरम्यान अनेकदा एकमेकांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं.

Pankja Munde and Manoj Jarange on Stage : भाजप नेत्या आणि महायुतीच्या बीड लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार पंकजा मुंडे ( Pankja Munde ) आणि मराठा आरक्षणासाठी उपोषण करून सरकारच्या नाकी नऊ आणणारे मनोज जरांगे. ( Manoj Jarange) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी ( Maratha OBC ) या वादा दरम्यान अनेकदा एकमेकांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी त्यांनी एकमेकांची आदराने विचारपूस केली.

आढळराव तीन लाख मतांनी विजयी होणार, आमदार मोहितेंनी घेतली विजयाची गॅरंटी

श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्या दोघांमध्ये यावेळी संवादही झाला. सुरुवातीला पंकजाताई आल्या तेव्हा त्यांना बसायला खुर्ची नसल्याने त्या खालीच बसल्या तेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी स्थानिक लोकांना पंकजाताईंना देखील खुर्ची द्यावी अशी सूचना केली. त्याबरोबर संयोजकांनी जरांगे पाटील यांच्या शेजारी पंकजाताईंना देखील बसायला खुर्ची दिली. पंकजाताई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपुसही केली.

चावी अजिदादांकडे पण खजिना माझ्या सहीशिवाय उघडतच नाही; फडणवीसांचं धाराशिवकरांना आश्वासन

मागील काही महिन्यांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा उभा असलेला लढा व त्यातच महाराष्ट्रासह देशात लागलेली लोकसभेची निवडणूक यामुळे एक वेगळाच तणाव सध्या वातावरणात आहे. परंतु वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर आज संतांच्या ठायी जातीच्या भिंती गळून पडल्याचे पाहायला मिळाले.

अकलूज बोले अन् सोलापूर जिल्हा हाले ही स्थिती नाही; तानाजी सावंतांचा मोहिते पाटलांवर हल्लाबोल

पंकजा मुंडे यांनी देखील आजपर्यंत कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध केलेला नाही किंवा अशा आरक्षण विरोधी कोणत्याही व्यासपीठावर कधीही पंकजा मुंडे गेलेल्या नाहीत. अलीकडच्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी देखील पंकजाताई मुंडे किंवा धनंजय मुंडे यांनी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही, असे स्पष्ट केलेले आहे.

तेव्हा देशाचे पंतप्रधान अमेरिकेजवळ जाऊन रडायचे, फडणवीसांची कॉंग्रेसवर सडकून टीका

स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी कधीही एखाद्या विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही किंवा याला मत द्या असे आवाहन केलेले नाही, इतकेच नव्हे तर पंकजाताई मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांना आम्ही मराठा आरक्षण विरोधी मानत नाही, अशीही जाहीर भूमिका त्यांनी घेतली होती. अशाही परिस्थितीत काही जणांकडून समाजात दुही माजेल असे वेगळे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याला आज या दोघांच्या एकत्र येण्याने उत्तर मिळाले असून हा क्षण नक्कीच दोन्ही समाजातील दुही कमी करणारा आणि सुखावणारा असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर देखील मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण केले जात असल्याचे दिसून येते, त्यामध्ये सबंध बीड जिल्हा ढवळून निघाला असताना आज जरांगे पाटील व पंकजा मुंडे यांच्यातील हे क्षण व संवाद हा सुखावणारा होता.

follow us