Pankaja Munde : ‘मलाही मुंबईत घर मिळत नव्हतं’; पंकजा मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा…
Pankja Munde : मुंबईतील मुलुंडमध्ये नूकताच मराठी माणसाला घर नाकारल्याचा प्रकार घडला आहे. त्यावरुन संतप्त महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करीत राजकीय पक्षांवर ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळालं होतं. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी सरकारवर टीका केल्याचंही दिसून आलं आहे. आता भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनीही या विषयावर भाष्य केलं आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी जेव्हा शासकीय बंगला सोडला होता, तेव्हा मुंबईत मला घर शोधण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला होता. मराठी माणूस म्हणून मलाही मुंबईत घर नाकारल्याचा अनुभव आला होता. आमच्या भागात मराठी लोकांना घर देत नाही, याबाबत मीदेखील अनुभव घेतल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. यावेळी या प्रकारावरुन पंकजा मुंडे यांना नाराजीही व्यक्त केली आहे.
डॉ. एम. एस. स्वामीनाथन : …अन् IPS झालेला मुलगा शेतकऱ्यांचं आयुष्य बदलण्यासाठी बांधावर रमला
नूकताच मुंबईत एका महिलेला घर नाकारल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार दुर्देवी असून भाषावाद, प्रांत अशा विषयांवर मी कधीच भाष्य करीत नाही, पण सध्याची राजकीय, सामाजिक परिस्थिती पाहुन मन खिन्न होत असल्याचंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
आनंदाची बातमी! म्हाडामध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
मराठी माणून म्हणून जागा नाकारल्यानंतर त्या तरुणीने जो व्हिडिओ टाकला तो संताप आणणारा आहे. राज्यात सध्या आरक्षणावरून वेगवेगळे समाज समोरासमोर येत आहेत, जाती-जातीमध्ये भांडणे सुरू झाली आहेत. एकीकडे सगळी सुबत्ता आहे, सोयी आहेत, गाड्या आहेत तरी समाजामध्ये अस्वस्थता असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
Sanjay Raut : नागपूर पाण्यात बुडालं अन् तुम्ही कलाकारांसोबत… राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल
समाज वेगवेगळ्या रंगात वाटला गेला आहे, हिरवा, पिवळा, निळा, भगवा. कधी कधी वाटतं एका चक्रावर हे सगळे रंग एकत्र करून फिरवली तर त्यातून पांढरा रंग तयार होतो. पांढरा रंग हा शांततेच प्रतीक आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहून मन अस्वस्थ होतं, असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, तृप्ती देऊळगावर नामक महिला मुलुंड भागात घर पाहण्यासाठी गेले असता तिथल्या सोसायटी सचिवांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मराठी माणसाला घर नाकारल्याने संतप्त महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओमध्ये महिला म्हणतेयं, मला अतिशय वाईट अनुभव आला आहे. मराठी माणसाला मुंबईत ज्या पद्धतीची वागणूक मिळत आहे. ती अतिशय वाईटच आहे. हे आत्ताच थांबलं नाही तर पुढे मराठी माणूस नावालाही मुंबईत शिल्लक राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तरी घ्यायची आपली लायकी राहिलेली आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता.