आनंदाची बातमी! म्हाडामध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

  • Written By: Published:
आनंदाची बातमी! म्हाडामध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Maharashtra Housing : महाराष्ट्र गृहनिर्माण (Maharashtra Housing) आणि क्षेत्र विकास प्राधिकरण यांचे प्रादेशिक मंडळ पुणे यांनी 2023 च्या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या 5863 घरांच्या वाटपासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. मात्र, विविध कारणास्तव असलेल्या सुट्यांमुळं अधिवास प्रमाणपत्रासारखे महत्वाचे प्रमाणपत्रासाठी सादर करण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळं पुणे गृहनिर्णाण क्षेत्र विकास प्राधिकरणाने 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली.

यासंदर्भात म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पुण्यासह म्हाडाच्या सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील पाच हजार ८६३ घरांसाठी सोडत जाहीर झाली आहे. त्यासाठी बुधवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदतीत अर्ज करणारे आणि प्रत्यक्षात पैसे भरणाऱ्यांच्या संख्येत तफावत आहे. आतापर्यंत 32 हजार 996 हून अधिक जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 18 हजार 269 हून अधिक जणांनी पैसे भरले आहेत. ऑगस्ट महिन्यात अधिक सुट्ट्या असल्याने रहिवासी दाखला व इतर कागदपत्रांची पूर्तता करणे अशक्य झाले आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची 100 एकरात जाहीर सभा, पुढचं प्लॅनिंग काय? 

याबाबत लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून मुदत वाढवून देण्याची मागणी होत होती. ऑक्टोबरमध्ये प्रमाणपत्र काढता यावे. तसेच घटस्थापनेनंतर पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळावी, यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला, असं अशोक पाटील यांनी सांगितले. म्हाडाच्या पाच हजार 863 घरांपैकी पुणे जिल्ह्यात पाच हजार 425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यात 69, सांगलीत 32 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 337 सदनिका वितरणासाठी उपलब्ध आहेत.

तर म्हाडाच्या विविध योजनेंतर्गत ४०३ सदनिका, म्हाडाच्या पीएमएवाय योजनेंतर्गत ४३१, आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २५८४ तसेच म्हाडाच्या योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार २४४५ अशा पाच हजार ८६३ सदनिकांचा समावेश आहे.

एकूण 5 हजार 863 सदनिकांमध्ये म्हाडाच्या विविध योजनांतर्गत 403 सदनिका, म्हाडाच्या PMAY योजनेंतर्गत 431 आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2584 तसेच म्हाडाच्या योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास यानुसार 2445 अशा 5863 सदनिकांचा समावेश आहे. दरम्यान, नागरिकांना मुदतवाढ मिळाल्यानं आता अनेकांना घरांचं स्वप्न साकारता येणार आहे.

गृहनिर्माण अर्जाचे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर

ऑनलाइन रक्कम स्वीकारण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर

मंजूर अर्जांची प्रोफॉर्मा यादी प्रकाशित – 27 ऑक्टोबर

अंतिम यादी जाहीर – 3 नोव्हेंबर

अंतिम सोडत – 9 नोव्हेंबर सकाळी १० वाजता

यशस्वी आणि प्रतीक्षा यादीतील नावांची घोषणा – 27 ऑक्टोबर सायंकाळी 6 वा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube