Download App

2002 पूर्वी गुजरातमध्ये…, गुजरात दंगलींवर पंतप्रधान मोदींचा मोठा गौप्यस्फोट

Lex Fridman Podcast Modi: अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन (Lex Fridman Podcast) यांच्या पोडकास्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • Written By: Last Updated:

Lex Fridman Podcast PM Modi: अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन (Lex Fridman Podcast) यांच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली आहे. तसेच या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी गुजरात दंगलीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींना (PM Modi) गुजरात दंगलीवर प्रश्न विचारण्यात आला होता. या पॉडकास्टमध्ये गुजरात दंगलीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2002 पूर्वी गुजरातमध्ये 250 हून अधिक मोठ्या दंगली झाल्या. 1969 मधील दंगली सुमारे सहा महिने चालल्या. या दंगलींचा मी येण्याच्या खूप आधीपासून इतिहास आहे. असं या पॉडकास्टमध्ये बोलताना मोदी म्हणाले.

या प्रश्नावर पुढे बोलताना मोंदी म्हणाले की, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या गुजरातमध्ये वर्षभर काही ठिकाणी दंगली व्हायच्या, त्याच गुजरातमध्ये 2002 नंतर एकही दंगल घडलेली नाही. पूर्ण शांतता आहे. आम्ही व्होट बँकेचे राजकारण करत नाही, आम्ही सब का साथ, सबका विकास, सबका विश्वास या मंत्राचे पालन करतो. असेही या पॉडकास्टमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संघाचे कार्य समजून घ्या : पंतप्रधान मोदी

तसेच पंतप्रधान मोदींनी या पॉडकास्टमध्ये बोलताना, आरएसएसबद्दल देखील भाष्य केले. आरएसएसबद्दल काय सांगू शकता आणि या संघटनेचा तुमच्यावर काय परिणाम झाला? असा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारण्यात आला होता. यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या 100 वर्षात, आरएसएसने जगाच्या झगमगाटापासून दूर राहून भक्तीने काम केले आहे आणि हे माझे भाग्य आहे की, मला अशा संघटनेकडून जीवनमूल्ये मिळाली, मला उद्देशपूर्ण जीवन मिळाले, माझे भाग्य आहे की मी काही काळ संतांमध्ये गेलो. असं मोदी म्हणाले.

औरंगजेब महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कलंक ; आमदार सत्यजित तांबे

तसेच आज कोट्यवधी लोक आरएसएसशी जोडलेले आहेत, आरएसएस समजून घेणे इतके सोपे नाही, त्याचे कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’ संघ तुम्हाला जीवनाच्या उद्देशाबाबत चांगले मार्गदर्शन करतो. असेही या पॉडकास्टमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले.

follow us