PM Modi : अयोध्यामध्ये पार पडलेल्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची राम मंदिर प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीजी महाराज (Govind Devagiri Maharaj) यांच्याकडून थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली. त्यावरून विरोधकांकडून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात येत आहे. या दरम्यान ठाकरे गटाकडून आजच्या सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.
सामनामध्ये म्हटले आहे की, राम जन्मभूमीवर श्रीरामांचे मंदिर उभे राहिले व मोदी भक्त भलतेच भावूक झाले. पंतप्रधान मोदींनाही अश्रू अनावर झाले. या भावूकपाणातही शेवटी ढोंगच दिसले. कारण मंदिर उद्घाटन सोहळ्यात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदी यांना थेट छत्रपतींच्या घोड्यावर चढवले. पंतप्रधान मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे श्रीमान योगी आहेत.
Nitesh Rane : पोलीस काहीही वाकडं करू शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर; राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
भाजप आणि त्यांचे व भाजप पुरस्कृत संतमहंतांचे म्हणणे आहे की, मोदी हे शिवाजी राजेच आहेत व ते नसते तर आयोध्यातील राम मंदिर उभेच राहिले नसते. थोडक्यात भाजपच्या संतांनी आता मोदी यांना शिवाजी केले. मोदी कधी श्रीराम, कधी विष्णूचे तेरावे अवतार तर कधी छत्रपती शिवराय असतात. ते फक्त देशाचे कर्तव्यतत्पर आणि धाडसी पंतप्रधान नसतात.
Rahat Fateh Ali Khan कडून नोकराला मारहाण? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर नोकरासह स्पष्टीकरण
त्यामुळे भाजपकडून मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी करत एक प्रकारे शिवरायांचा अपमानच करण्यात आला आहे. कारण छत्रपती शिवरायांनी तलवारीच्या बळावर मुघलांचा सामना केला. त्यांच्या हातात आयते राज्य पडले नाही. ईव्हीएम आणि श्रीमंत सावकारांच्या बळावर त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले नाही. ईव्हीएम हे भाजपचे सुदर्शनचक्र आहे. ते नसेल तर मोदी आणि त्यांच्या पक्षाचे काय होईल? याचा खुलासा मोदींना घोड्यावर बसवणाऱ्यांनी करायला हवा. अशी टीका सामना मधून करण्यात आली आहे.
काय म्हणाले होते स्वामी गोविंददेव गिरी महाराज?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात आपल्याला श्रीमंत योगी भेटले आहेत, पंतप्रधानांचा हा जो तप आम्ही तुमच्यात पाहिला, ही परंपरा पाहताना आम्हाला केवळ एक राजा आठवतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे मल्लिकार्जुन दर्शनासाठी श्रीशैलमला गेले, तीन दिवसांचा उपवास केला, तीन दिवस शिवमंदिरात राहिले, तेव्हा महाराज म्हणाले, मला राज्य करायचे नाही. मला संन्यास घ्यायचा आहे. शिवाची आराधना करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. मला संन्यास घ्यायचा आहे, परत घेऊन जाऊ नका. इतिहासातील हा विलक्षण प्रसंग आहे. त्या प्रसंगात महाराजांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत घेऊन आले. कारण स्वराज्य हेही तुमचे कार्यच आहे.
आज असेच एक महापुरुष आपल्याला भेटले, ज्यांना आई जगदंबेने हिमालयातून परत पाठविले आणि सांगितले जाऊन भारत मातेची सेवा कर. तुला भारत मातेची सेवा करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांचीही मला आठवण आली. त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हंटले होते की, निश्चयाचा महामेरु, बहुतजणांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी.. श्रीमंत योगी. आपल्याला असेच एक श्रीमंत योगी आज मोदींच्या रुपात भेटले आहेत, असेही ते म्हणाले.