Pm Narendra Modi News : देशात ज्यांना कोणी विचारलं नाही त्यांना मी पूरजं असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातील विविध विकासकामांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे. यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
Pune Drug Case मध्ये महत्त्वाची अपडेट; कुरकुंभ दिल्ली व्हाया लंडनला असं पोहचलं 140 किलो एमडी ड्रग्ज
पंतप्रधान मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर ते 2014 पर्यंत देशातील 100 घरांपैकी 15 घरांत नळाने पाणी यायंच, मात्र आमच्या सरकारने ‘नल से जल’ योजना आणली आहे. पाण्याचं महत्व विदर्भासियांपेक्षा अधिक कोण जाणतं. यासोबतच 26 गुंतलेल्या 12 योजना आम्ही केल्या असून बाकी योजनांवर काम सुरु आहे. आम्ही कृष्णा सिंचन योजना, नळवंडे धरण प्रकल्पाचं काम पूर्ण केलं आहे. अनेक दशकांनंतर ही कामे आता पूर्ण झाली असल्याचीही टीका मोदींनी केली आहे.
तसचे देशातल्या 3 करोड बहिणींना लखपती दीदी बनवलं आहे. मोदींची गॅरंटी म्हणजे पूर्ण होण्याची गॅरंटी आहे. 40 हजार करोड रुपयांचा विशेष निधी महिलांना दिला आहे . अनेक महिलांना याचा लाभ झाला आहे. आमचं सरकार गरीबांच्या हिताला समर्पित असून ज्यांना कोणी कधी विचारल नाही त्यांना मोदींनी पूजलं असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.
रसिकलाल धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त शिष्यवृत्ती वितरण अन् रक्तदान शिबीराचे आयोजन
देशातील ओबीसी बांधवांसाठीही आम्ही अनेक योजना आणल्या आहेत. 13 हजार कोटींची विश्वकर्मा योजना आणली असून काँग्रेसच्या काळात आदिवासींना कधीच सुविधा दिल्या नाहीत. नेहमीच आदिवासींकडे काँग्रेसने दुर्लक्ष केलं आहे. आदिवासींच्या विकासासाठी 23 हजार कोटींची पीएम जनमन योजना सुरु केली असून आदिवासींनी ही योजना चांगलं जीवन देणार असल्याचंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले आहेत.
‘जरांगेंची SIT चौकशी ‘चिवट’पणे करा’; ‘चिवट’ शब्दावर जोर देत उद्धव ठाकरेंची मागणी…
दरम्यान, केंद्रात जेव्हा युपीए सरकार होतं तेव्हा तेव्हाची स्थिती काय होती तेव्हा कृषीमंत्रीही महाराष्ट्राचेच होते. त्यावेळी दिल्ली ते विदर्भातील शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज जाहीर व्हायचं पण मध्येच लुटलं जायचं. गाव, गरीब, शेतकरी, आदिवसींना काही मिळत नव्हतं. आज मी एक बटन दाबलं आणि पीएम किसान योजनेचे 21 हजार करोड रुपये शेतकऱ्यांच्या खातेवर पोहोचले ही तर मोदींची गॅरंटी असल्याचं म्हटलं आहे