Download App

‘PM मोदींनी शरद पवारांना म्हटलं नाही’; ‘भटकती आत्मा’वर विजय शिवतारेंनी मौन सोडलं…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं नसल्याचं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

Vijay Shivtare : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) ‘भटकती आत्मा’ म्हटलं नसल्याचं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, पुण्यात पार पडलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे ‘भटकती आत्मा’ म्हटलं होतं. त्यावरुन राज्यातील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. विजय शिवतारेंनी प्रतिक्रिया देत मोदींनी शरद पवारांना असं म्हटलं नसल्याचं सांगितलं आहे.

भटकती आत्मा! ‘माझं बोट धरुनच राजकारणात आलेत..,’, पवारांनी मोदींची सुरुवातच काढली

विजय शिवतारे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ‘भटकती आत्मा’ हे विधान जनरल होतं. कुणाला एकाला टार्गेट केलं असं बोलणं चुकीचं आहे. कालपासून भटकती आत्मा असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. मोदींनी शरद पवारांवर टीका केलीयं, असं म्हणणं चुकीचे असल्याचंही विजय शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे.

मोदींनी माढ्यात विजयाचा डाव टाकला! धनगरी पोशाख, माफी अन् येळकोट-येळकोटचा जयघोष

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार प्रत्येक मतदारसंघात लीड घेणार असून ही निवडणूक भावकी आणि गावकीची नाही, ही लढाई मोदी आणि राहुल गांधी यांच्यात लढाई आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता भोर मतदारसंघात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची मोठी सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून भोर मतदारसंघातील प्रश्न सोडवले जाणार आहेत. वाघोली आणि वारजे या दोन ठिकाणी नितीन गडकरी यांच्या सभा होणार आहेत. अमित शहा यांची एक सभा बारामती लोकसभा मतदारसंघात होणार असल्याचंही शिवतारेंनी स्पष्ट केलं आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना काल राज्यातील विविध मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पार पडल्या. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर मोदींची सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदी म्हणाले, ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांची आत्मा भटकत असते, स्वत:चं काही झालं नाहीतर दुसऱ्यांचं बिघडवण्यात त्यांना अधिक चांगलं वाटतं. महाराष्ट्रही अशा भटकती आत्माचा शिकार झालेला आहे, काही वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्यांने स्वत:च्या महत्वाकांक्षेसाठी हा खेळ सुरु केला असल्याची जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. यावेळी बोलताना मोदींनी शरद पवार यांचा नावाचा उल्लेख करणं टाळलं आहे.

follow us