भटकती आत्मा! ‘माझं बोट धरुनच राजकारणात आलेत..,’, पवारांनी मोदींची सुरुवातच काढली
Sharad Pawar On Pm Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना भटकती आत्मा म्हणत त्यांच्यावर जळजळीत टीका केल्याचं पाहायला मिळालं. या टीकेवरुन आता राज्यात रणकंदन सुरु आहे. मोदींच्या टीकेनंतर शरद पवारही आता पुढे सरसावले आहेत. होय मी अस्वस्थ भटकती आत्मा पण स्वत:च्या स्वार्थासाठी नाहीतर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ असल्याचं थेट प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं आहे. शिरुरमध्ये आयोजित सभेत पवार बोलत होते.
फडणवीससाहेब, फुंकर मारून यांचा वाडा उद्धवस्त करा; सदाभाऊ खोतांचा मोहिते पाटलांवर निशाणा
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते राज्यातील विविध मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत आहेत. या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल चढवित आहेत. पुण्यातील रेसकोर्स परिसरात काल मोदींची सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांची आत्मा भटकत असते, स्वत:चं काही झालं नाहीतर दुसऱ्यांचं बिघडवण्यात त्यांना अधिक चांगलं वाटतं. महाराष्ट्रही अशा भटकती आत्माचा शिकार झालेला आहे, काही वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्यांने स्वत:च्या महत्वाकांक्षेसाठी हा खेळ सुरु केला असल्याची जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. यावेळी बोलताना मोदींनी शरद पवार यांचा नावाचा उल्लेख करणं टाळलं आहे.
माजी मंत्र्याचा डबलगेम! आधी शिंदेंना जय महाराष्ट्र, आता ‘बीड’मध्ये महायुतीला धक्का
सध्या शरद पवार यांचाही महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राज्यभरात जाहीर सभांचा तडाखा सुरु आहे. शिरुरमध्ये आज सभेत बोलताना शरद पवारांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, मोदींचा सध्या माझ्यावर खूप राग असून त्यांनी याआधीच्या काळात भाषण केलं होतं की, मी शरद पवारांच्या बोटाला धरुनच राजकारणात आलो आहे. पण आता ते मला महाराष्ट्रात एक भटकती आत्मा असल्याचं बोलत आहेत. होयं माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरयं, पण स्वत:च्या स्वार्थासाठी नसून लोकांच्या दु:खासाठी, शेतकऱ्यांचे दु:ख पाहुन माझा आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यात गैर नाही. देशातली जनता सध्या महागाईने त्रस्त असून प्रपंच करणे अवघड झालं आहे, त्यामुळे जनतेसाठी मी 100 वेळा अस्वस्थ होणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितलं आहे.
युवराजाला आपसूक सत्ता मिळत नाही म्हणून निवडणूक आयोग हुकूमशाही ठरत नाही, मोदींचा घणाघात
किंमत मोजावी लागली तरीही चालेल पण लाचार होणार नाही :
लोकांचं दु:ख पाहुन मी तडफडतो, मला कोणतीही किंमत मोजावी लागली तरीही मी लाचार होणार नाही. हा महाराष्ट्र कधीच लाचार होणार नसून भाजपने आमचं घर फोडलं, पक्ष फोडलायं, अनेक वर्षे काम करण्याची संधी दिलेल्या लोकांना फोडलंय. फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं नसून जनतेच्या फायद्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथं तर अडचणीत आणण्यासाठी गैरवापर केला जात असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं आहे.