PM Modi First Podcast With Nikhil Kamath : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखील कामथसोबत (Nikhil Kamath) पहिलं पॉडकास्ट (PM Modi First Podcast) केलंय. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. पीएम मोदींनी सांगितलं की, लहानपणी ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे कपडे धुवायचे. जेणेकरून ते तलावावर जाऊ शकतील, पोहायलो तेथेच शिकलो. पीएम मोदी म्हणाले की, माझा (PM Narendra Modi) जन्म गुजरातच्या मेहसाणातील वडनगरमध्ये झाला.
दिवसरात्र शिव्या ऐकून कसं वाटतं, यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की मी अहमदाबादी आहे. आमचे अहमदाबादी लोकांची एक वेगळीच ओळख आहे. एक अहमदाबादी स्कूटर घेवून जात होता, एकाला धडकला. समोरचा संतापला, तो शिव्या देवून लागला. अहमदाबादी स्कूटर घेवून थांबला. तेव्हा रस्त्याने जाणारा एक माणूस बोलला अरे तो तुला शिव्या देत आहे, अहमदाबादी व्यक्ती बोलला शिव्या देत आहे, काही घेवून तर जात नाहीये. अहमदाबादी लोकांची बातच न्यारी असं देखील मोदी म्हणाले आहेत.
पीएम मोदी म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की, कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. मी स्वतःसाठी काहीही करणार नाही. वाईट हेतूने मी कधीही चुकीचे काम करणार (PM Narendra News) नाही. मी हाच जीवनाचा मंत्र बनवला आहे. मी रंग बदलणारी व्यक्ती नाही. जर तुम्ही कधीच काही चुकीचे केले नसेल तर तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. पीएम मोदी म्हणाले की, मी सुद्धा एक माणूस आहे, देव नाही. माझ्याही चुका होतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बालपणीच्या आणि बालपणीच्या मित्रांच्या कथा पॉडकास्टमध्ये शेअर केल्या आहेत. मोदी म्हणाले की, त्यांना आता कोणीही मित्र नाहीत, त्याला ‘तू’ म्हणणारे कोणीही नाही. मोदींनी सांगितलं की, त्यांच्या शिक्षकाचं नाव रशबिहारी मणियार होतं. जेव्हा ते पत्र लिहायचे तेव्हा ते नेहमी मोदींना संबोधून ‘तू’ असं लिहायचे. परंतु नुकतेच वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. पीएम मोदी म्हणाले की, राशबिहारी मणियार हे एकमेव व्यक्ती होते जे त्यांना ‘तू’ म्हणून संबोधत होते.
राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण? उत्तर मिळालं, सुरेश धसांनीच केला मोठा खुलासा
जेव्हा पंतप्रधान मोदींना त्यांच्या बालपणीच्या मित्रांबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ‘माझं प्रकरण थोडे विचित्र आहे, मी लहान वयात घर सोडले. म्हणजे, मी सर्व काही सोडलं. कोणाशीही संपर्क नव्हता. त्यामुळे खूप अंतर होते. मला कोण विचारणार, या विचारात एका अनोळखी भटकंतीचं माझं आयुष्य होतं. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा माझ्या वर्गातीलसर्व जुन्या मित्रांना सीएम हाऊसमध्ये बोलवावे अशी इच्छा निर्माण झाली. मी त्या मित्रांसोबत बसतो, पण खूप अंतर असल्याने मी त्यांना चेहऱ्यावरूनही ओळखू शकलो नाही. 35-36 लोक जमले होते आणि रात्रीचे जेवण केले, गप्पा मारल्या आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला, पण मला मजा आली नाही. कारण मी मित्र शोधत होतो आणि त्यांनी फक्त मुख्यमंत्री पाहिले. त्यामुळे ती पोकळी भरून निघाली नाही. ते लोक अजूनही माझ्या संपर्कात आहेत, पण ते माझ्याकडे मोठ्या आदराने पाहतात, असं देखील मोदी म्हणालेत.
पीएम मोदी म्हणाले, पॉडकास्टचे जग माझ्यासाठी नवीन आहे. माझे आयुष्य एखाद्या भटक्या माणसासारखे होते. ते म्हणाले, राजकारणात प्रवेश करणे ही एक गोष्ट आहे. राजकारणात यशस्वी होणे ही दुसरी गोष्ट आहे. त्यासाठी समर्पण असायला हवं, हे मला मान्य आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वच वर्गातील लोक सामील झाले, परंतु सर्वच जण राजकारणात सामील झाले नाहीत, तर ती राष्ट्रभक्तीने प्रेरित चळवळ होती. स्वातंत्र्यानंतर राजकारणात बरेच आले. स्वातंत्र्यानंतर उदयास आलेल्या राजकारण्यांची विचारसरणी आणि परिपक्वता वेगळी आहे, त्यांचे शब्द समाजाला समर्पित आहेत. चांगली माणसे राजकारणात येत राहिली पाहिजेत, त्यांनी महत्त्वाकांक्षा घेऊन नव्हे तर ध्येयाने यावे, असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.