Download App

महायुतीत जागा वाटपावरून पुन्हा रस्सीखेच? राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘इतक्या’ जागांवर उमेदवार देण्याची तयारी

Praful Patel : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महायुती

  • Written By: Last Updated:

Praful Patel : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागावर निवडणूक लढण्याची तयारी केली असल्याची माहिती दिली आहे. यामुळे महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकाप्रमाणे जागा वाटपावरुन झालेली रस्सीखेच पुन्हा एकदा महायुतीत पाहायला मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

गोंदियामध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये प्रफुल पटेल की, राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व जागांची मागणी करू शकत नाही मात्र आम्ही जुनी राष्ट्रवादी असून आमचे सहकारी 57 आमदार आहेत. त्या अनुषंगाने ज्याप्रमाणे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले त्याप्रमाणे 85 ते 90 जागा मागण्याचा आमचा विचार आहे आणि त्या अनुषंगाने आमची मागणी 85 ते 90 जागावर लढण्याची राहील असं प्रफुल पटेल म्हणाले.

पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष असो त्या पक्षाने सुरुवात तिला युती होण्यापूर्वी 288 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी लागते. आम्ही सुद्धा 288 जागा वर निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे. जेव्हा आपण युतीमध्ये बसतो तर त्यामध्ये वाटाघाटी करून जागा लढवाव्या लागतात पण युती होण्यापूर्वीच आपण 288 जागांवर तयारी ठेवावी लागते असे प्रत्येक पक्षांचे धोरण असते असेही प्रफुल पटेल म्हणाले.

याच बरोबर राज्यात विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकांसारखी परिस्थिती नसेल आणि राज्यात महायुती पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून निवडणुकीसाठी सध्या सहा महिने शिल्लक आहे आणि अनेक जागा सुद्धा रिक्त असल्याने लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहितीही त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

BJP MLA T Raja Singh : मोठी बातमी! भाजप आमदार टी.राजा यांना अटक

follow us