Praful Patel On Chhagan Bhujbal : ओबीसीतून (OBC) मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. सरकारने याबाबत अधिसूचना काढली आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. यावर आम्ही हरकती घेऊ, असे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल ( Praful Patel ) यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
लालू-तेजस्वींवर दुहेरी संकट, ईडीकडून पुन्हा समन्स, 9 फेब्रुवारीला हजर राहण्याचे निर्देश
प्रफुल्ल पटेल म्हणाले, छगन भुजबळ ओबीसींच्या बाबतीत आपली भूमिका समता परिषदेच्या माध्यमातून मांडत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते समता परिषदेचे काम करत आहेत. ओबीसीच्या आणि मराठ्याच्या आरक्षणासंबंधी त्यांची भूमिका ही समता परिषदेच्या माध्यमातून असते. राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नसते. छगन भुजबळ यांनी कधीही ज्या मराठ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, अशांचा त्यांनी कधी विरोध केला नाही. त्याबाबत त्यांची भूमिका ही पॉझिटिव्ह राहिली आहे. कारण कुणबी ही ओबीसी समाजाची जात असल्यामुळे त्याबाबत त्यांनी कधी विरोध केला नाही. मात्र ओबीसीमध्ये ही संख्या वाढत असल्याने ओबीसीच्या बाबतीत काही अधिक काही करता येईल का? याबाबत सरकार प्रयत्न करणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
शरद पवार, ठाकरे, पटोले आता का नाही बोलत ? प्रकाश शेंडगेंचा रोखठोक सवाल
सगे-सोयरे कोर्टात टिकेल का?
जरांगे यांनी सगे-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची मागणी केली आहे. हे मागणी कोर्टात टिकेल का? याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. कोर्टात काय टिकते की नाही? हे मी भविष्यवाणी करू शकत नाही. परंतु यापूर्वीही कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या संबंधाने क्युरेटिव्ह दाखल करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याबाबतीत आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते? आणि मी आताच भविष्यवाणी करू शकत नाही. सुप्रीम कोर्ट याबाबतीत योग्य ते निर्णय देतील.