Praful Patel : राज्यात ज्या वेळेस महाविकास आघाडी सरकार कोसळून ज्यावेळेस एकनाथ शिंदे सूरत, गुवाहाटी, गोव्यात फिरत होते. त्यावेळी राष्ट्रवादी भाजप शिंदेंसोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी करत होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे 53 आमदार अनिल देशमुख, नवाब मलिक जेलमध्ये असल्याने त्यांना वगळता 51 आमदार भाजप, शिंदेंसोबत सत्तेत जाण्याची तयारी करत होते. यावेळी सर्व आमदारांनी भाजप आणि शिंदेंसोबत सत्ता स्थापन केली पाहिजे असा प्रस्ताव ठेवला होता. यावर मात्र कुणीच चर्चा करत नाही. पण, नजीकच्या काळा ज्या घडामोडी घडल्या त्यावर जास्त गदारोळ केला जात आहे, अशा शब्दांत अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेला दावा खोडून काढला.
आव्हाडांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार; ‘त्या’ ट्विटवर अण्णा हजारे आक्रमक
प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यांच्या या वक्तव्यांची आता राज्याच्या राजकारणात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पटेल पुढे म्हणाले, चार पाच लोकांना अडचण होती म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा प्रस्ताव शरद पवारांकडे ठेवला असे म्हणण्यात काही तथ्य नाही. इतकेच नाही तर आज जे लोक शरद पवारांबरोबर आहेत ते देखील भाजपबरोबर जाण्याच्या मानसिकतेत होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या 51 आमदारांनी शरद पवारांना लेखी देत सांगितले होते की आपल्याला एकनाथ शिंदे आणि भाजपबरोबर जायला पाहिजे. आता त्यावेळी म्हणजे 2022 ची ही गोष्ट आहे यावर मात्र कुणीच बोलत नाही.
यानंतर पटेलांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना राष्ट्रवादीबाबत काय घडामोडी घडल्या याचाही खुलासा केला. ते म्हणाले, महाविकास आघाडीत राष्ट्रवादीसाठी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. शिवसेनेकडे 56 तर राष्ट्रवादीकडे 54 आमदार आहेत. त्यामुळे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी केली होती. दुसरा प्रस्ताव उद्धव ठाकरेंकडे ठेवला होता. त्यानुसार तीन वर्षे शिवसेना आणि दोन वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहिल असे त्या प्रस्तावात म्हटले होते.
भुजबळांनी आम्हाला डिवचू नये, मराठा समाज पेटला तर…; मनोज जरांगे-पाटलांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहा ते सात आमदार आणि खासदार माझ्याकडे आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपबरोबर जाण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असा दावा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता.