Download App

Praful Patel with Sharad Pawar : ‘शरद पवारांसोबतचा क्षण खास’; पटेलांनी फोटो शेअर करुन व्यक्त केल्या भावना

Praful Patel with Sharad Pawar : नव्या संसदेत आज विशेष अधिवेशनाच्या कामकाजाने सुरुवात झाली. संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षणासह इतरही महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी देशातल्या सर्वच खासदारांनी हजेरी लावली असून यामध्ये विशेषत: राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसोबतचा संसदेतला फोटो शेअर करत हा क्षण खास असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट केल आहे.

संसदेत एका खास पोझमध्ये शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेल यांनी फोटो काढून तो शेअरही केला आहे. यामध्ये पटेल यांनी शरद पवारांसह इतरही खासदारांसमवेतचा फोटो शेअर केला आहे. दुसरा फोटो हा राज्यसभेच्या चेंबरमधला आहे, यामध्ये खासदार वंदना चव्हाण, शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी आणि प्रफुल्ल पटेल दिसत आहेत. हा फोटो संसदेतल्या कॅफेटेरियातला आहे.

शिर्डीत राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबीर; शरद पवार नगरच्या शिलेदारांना काय सांगणार?

पटेल पोस्टमध्ये म्हणाले, “नवीन संसद भवनातील आजचा ऊर्जेप्रमाणं उत्साहित दिवस. राज्यसभा चेंबर खूपच आकर्षक आहे आणि हा क्षण शरद पवारांसोबत शेअर केल्यानं आणखीनच खास बनला. कॅफेटेरियात मित्रांसह स्नॅक्स आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा आस्वाद घेत आहोत. खरोखरच आजचा दिवस लक्षात ठेवण्यासारखा” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचे पिल्लू, गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत उभी फुट पडली. अजित पवार यांच्यासह समर्थक नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी करुन सत्तेत सहभागी झाले. विशेष म्हणजे अजित पवारांच्या गटात प्रफुल्ल पटेलांसह सुनिल तटकरेंही सामिल आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने अजित पवार गटाकडून आमचीच राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांचा सोबत फोटो पाहिल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली आहे.

संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून, कोणत्या मुद्दांवर होणार चर्चा? महिला आरक्षणसाठी विरोधी पक्ष आग्रही

देशासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आजपासून नव्या संसदेच्या इमारतीमध्ये कामकाजाची सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी लोकसभेत बहुप्रतिक्षित असे ‘महिला आरक्षण विधेयक-2023’ मांडण्यात आले आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला संमती दिली होती. त्यानंतर आता आज कायदामंत्री अर्जून राम मेघवाल यांनी लोकसभेत सादर केले आहे.

महिला आरक्षण विधेयकात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के किंवा एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव आहे. या विधेयकात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अँग्लो-इंडियनसाठी 33 टक्के कोट्यामध्ये उप-आरक्षणाचाही प्रस्ताव आहे. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर राखीव जागा फिरवल्या जाव्यात, असा प्रस्ताव या विधेयकात आहेत.

follow us